Rules Change From 1st October 2022: 1 तारखेपासून बदलणार अनेक नियम, जाणून घ्या

1 october 2022: पाच दिवसांनी नवा महिना सुरु होणार आहे.
Money
MoneyDainik Gomantak

New Rules from October 1: पाच दिवसांनी नवा महिना सुरु होणार आहे. 1 ऑक्टोबरपासून सरकारकडून अनेक बदल केले जाणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. यामध्ये अल्पबचत योजनेपासून ते गॅस सिलिंडरच्या किमतीपर्यंत अनेक बदलांचा समावेश आहे. जाणून घेऊया 1 तारखेपासून कोणते नियम बदलणार आहेत.

अल्पबचत योजनेच्या व्याजदरात बदल होणार

अल्पबचत योजनेच्या व्याजदरांचे केंद्र सरकार (Central Government) दर 3 महिन्यांनी पुनरावलोकन करते. त्यामुळे सरकार लवकरच PPF, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, सुकन्या समृद्धी योजनेत उपलब्ध व्याजाची रक्कम वाढवू शकते. केंद्र सरकार 30 सप्टेंबर रोजी नवीन व्याजदर जाहीर करु शकते, जे 1 ऑक्टोबरपासून लागू होऊ शकते.

Money
RBI च्या उपकंपनीमध्ये थेट नोकरीची संधी, 23,59,000 रुपये मिळणार वार्षिक पगार

टोकनायझेशन प्रणाली लागू केली जाईल

RBI 1 ऑक्टोबरपासून कार्ड-ऑन-फाइल टोकनायझेशन (CoF कार्ड टोकनायझेशन) नियम लागू करत आहे. टोकनायझेशन प्रणालीत बदल केल्यानंतर कार्डधारकांना अधिक सुविधा आणि सुरक्षा मिळेल, असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे म्हणणे आहे. टोकनायझेशन प्रणाली लागू करण्याचा उद्देश ऑनलाइन बँकिंग फसवणूक रोखणे हा आहे.

Money
RBI Penalty On Banks: RBI ची 8 बँकांवर मोठी कारवाई, लाखोंचा ठोठावला दंड

गॅस सिलिंडरचे दर कमी होऊ शकतात

दर महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलिंडरच्या (Gas Cylinder) दरांचा आढावा घेतला जातो. यावेळी गॅस सिलिंडरच्या दरात कपात होण्याची शक्यता आहे. नैसर्गिक वायूच्या किमती नरमल्याने त्यात घट होण्याची शक्यता आहे.

डिमॅट खात्याच्या नियमांमध्ये बदल होणार

जर तुम्हीही शेअर (Share) बाजारात पैसे गुंतवले तर 30 सप्टेंबरपासून नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. डीमॅट खातेधारकांना 30 सप्टेंबर 2022 पर्यंत टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन पूर्ण करावे लागेल, त्यानंतरच तुम्ही तुमच्या खात्यात लॉग इन करु शकाल. असे न केल्यास अकाउंट ओपन होणार नाही.

Money
RBI Repo Rate: RBI सप्टेंबरमध्ये पुन्हा वाढणार रेपो रेट!

अटल पेन्शन योजनेच्या नियमांमध्ये बदल होणार

याशिवाय, 1 तारखेपासून कर भरणाऱ्या ग्राहकांना अटल पेन्शन योजनेचा लाभ घेता येणार नाही. सध्याच्या नियमांबद्दल सांगायचे झाल्यास, यावेळी 18 वर्षे ते 40 वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती या सुविधेचा लाभ घेऊ शकते. मग तो कर भरतो की नाही...

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com