गॅसच्या दरात 100 रुपयांनी वाढ! महिन्याच्या पहिल्याच दिवशी झटका

रकारी तेल विपणन कंपन्यांनी 1 डिसेंबरपासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या (LPG Gas) दरात वाढ केली मात्र देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होणार
LPG gas cylinder price raise today
LPG gas cylinder price raise todayDainik Gomantak

डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा मोठा फटका बसला आहे. सरकारी तेल विपणन कंपन्यांनी 1 डिसेंबरपासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या (LPG Gas) दरात वाढ केली आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) ने 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत प्रति सिलेंडर 103.50 रुपयांनी वाढ केली आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत (Delhi) 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 100.50 रुपयांनी वाढ झाली आहे.दिल्लीत आता व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 2101 रुपये झाली आहे.(LPG gas cylinder price raise today)

तथापि, तेल कंपन्यांनी सर्वसामान्यांच्या वापरासाठी 14.2 किलो विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ केलेली नाही. त्याच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत 14.2 किलोच्या विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरची किंमत 899.50 रुपयांवर कायम आहे.

विनाअनुदानित 14.2 किलोच्या सिलेंडरची किंमत

दिल्लीत आता अनुदानाशिवाय 14.2 किलोच्या सिलिंडरची किंमत 899.50 रुपये आहे. कोलकात्यात एलपीजी सिलिंडरची किंमत 926 रुपये, मुंबईत 899.50 रुपये आहे. चेन्नईमध्ये विनाअनुदानित सिलेंडरची किंमत आता 915.50 रुपये आहे.

LPG gas cylinder price raise today
कोविड अन् महागाई चिंतेचा विषय : अर्थतज्ज्ञांचे मत

19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या नवीन किमती

दिल्लीत 19 किलो व्यावसायिक गॅसची किंमत 100 रुपयांनी वाढून 2100.50 रुपये झाली आहे. कोलकातामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 101 रुपयांनी वाढून 2,174.5 रुपये झाली आहे. यापूर्वी त्याची किंमत 2073.5 रुपये होती.मुंबईत व्यावसायिक गॅसचा दर 2,051 रुपयांवर गेला आहे. यापूर्वी याची किंमत 1,950 रुपये होती. येथे 101 रुपयांची वाढ झाली आहे. त्याच वेळी, चेन्नईमध्ये 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 2,234.50 रुपयांवर गेली आहे. यापूर्वी त्याची किंमत 2,133 रुपये होती.

एलपीजी सिलेंडरची किंमत तपासण्यासाठी तुम्हाला सरकारी तेल कंपनीच्या वेबसाइटवर जावे लागेल. येथे कंपन्या दर महिन्याला नवीन दर जारी करतात. https://iocl.com/Products/IndaneGas.aspx या लिंकवर तुम्ही तुमच्या शहरातील गॅस सिलिंडरची किंमत तपासू शकता.

LPG gas cylinder price raise today
LPG वरील सबसिडी डिसेंबरपासून होणार पूर्ववत?

देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होणार

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. बुधवारी ब्रेंट क्रूडची किंमत 3.91 टक्क्यांनी घसरून 70.57 डॉलर प्रति बॅरल झाली. मात्र, डब्ल्यूटीआय क्रूडच्या किमती वाढल्या आहेत. WTI क्रूडच्या किमती 1.44 टक्क्यांनी वाढून 67.13 प्रति डॉलर बॅरलवर पोहोचल्या. कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाल्यामुळे देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होऊ शकतात.

तेल कंपन्यांनी बुधवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत देशातील प्रमुख तेल कंपन्या IOC, BPCL आणि HPCL यांनी आज इंधनाच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. सलग २७ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com