पेट्रोल आणि डिझेलनंतर आता एलपीजी गॅसचा भडका उडणार 

दैनिक गोमन्तक
रविवार, 14 फेब्रुवारी 2021

पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अगोदरच गगनाला भिडलेल्या असताना आता एलपीजी गॅसचा भडका उडणार आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अगोदरच गगनाला भिडलेल्या असताना आता एलपीजी गॅसचा भडका उडणार आहे. एलपीजी गॅसच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. उद्यापासून एलपीजी सिलेंडर 50 रुपयांनी महागणार आहे. आणि त्यामुळे प्रत्येक घरातील गृहिणींचे बजेट तर कोसळणार आहेच, त्याशिवाय पेट्रोल व डिझेल सोबतच आता एलपीजी सिलेंडरच्या किमतींमध्ये देखील मोठी वाढ झाल्यामुळे सामान्य जनतेच्या खिशाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. एलपीजी सिलेंडरच्या वाढल्यामुळे मध्यम वर्गीय आणि गरजू लोकांवर याचा अधिक परिणाम होणार आहे. 

वाहनचालकांनो सावधान! टोल भरताना फास्टॅग नसल्यास भरावा लागणार भुर्दंड

देशात मागील काही दिवसांपासून, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती किंमती सतत वाढत आहेत. देशातील काही ठिकाणी पेट्रोल व डिझेलचे दर 90 ते 100 रुपयांवर पोहचलेले आहेत. मध्य प्रदेशात प्रीमियम पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या पुढे गेली आहे. तर मुंबईत पेट्रोल 95 रुपयांवर गेले आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर कोरोनाच्या काळानंतर पुन्हा एकदा जागतिक तेलाच्या किमतीनुसार दररोज ठरवण्यात येऊ लागले आहेत. तर एलपीजी गॅसच्या किंमतींचा आढावा प्रत्येक 15 दिवसांनी घेण्यात येऊ लागला आहे. 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून वाढत चाललेल्या सिलेंडरसहित पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवर बोलताना सरकारने आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे आणि नैसर्गिक वायूच्या वाढत्या किंमतींमुळे भारतातही त्याची किंमत झपाट्याने वाढत असल्याचे म्हटले आहे. तर पेट्रोल आणि डिझेलवर मोठ्या प्रमाणात केंद्राने आणि राज्याने कर लावल्यामुळे किंमती अशा उच्च पातळीवर पोहचल्या असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे.   

संबंधित बातम्या