महाबॅंकेतर्फे कोविड  पतपुरवठा साहाय्य

Dainik Gomantak
मंगळवार, 26 मे 2020

बॅंकेच्या सुविधांची माहिती देवून साहाय्य करण्याकरिता संपर्क साधला आहे.

पुणे

बॅंक ऑफ महाराष्ट्रातर्फे कोविड 19 मदत उपायाअंतर्गत सूक्ष्म, लघु आणि मध्यम (एमएसएमई) उद्योग तसेच कृषी आणि किरकोळ विभागांना अतिरिक्त कर्ज साहाय्य दिले आहे. मार्च ते मे या कालावधीत सुमारे एक लाख कृषी, एमएसएमई, स्वसहायता गट, किरकोळ, एमएसएमई क्षेत्रांतर्गत लाभार्थ्यांना 2 हजार 789 कोटी रुपयांची कर्जे मंजूर केली.
बॅंकेने एसएमएस, ईमेल, वेबिनार आणि समर्पित टीमच्या माध्यमातून आणि शाखांकडून दूरध्वनीद्वारे प्रत्येक ग्राहकांमध्ये जागरूकता वाढविण्याच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. बॅंकेच्या सुविधांची माहिती देवून साहाय्य करण्याकरिता संपर्क साधला आहे. अर्थमंत्र्यांद्वारे घोषित केलेल्या प्रेरणा पॅकेजचा विस्तार करण्यासाठी आणि व्यापार तसेच व्यवसायांना उत्तेजन देण्यासाठी बॅंक सज्ज झाली आहे.
 

संबंधित बातम्या