Mahindra Atom EV टाटाच्या Tiago EV पेक्षा निम्म्या किमतीत मिळेल, जाणून घ्या कारची माहिती?

महिंद्राची 4 सीटर अ‍ॅटम इलेक्ट्रिकची सध्या खूप चर्चा होत आहे. कंपनीकडून अॅटम ईव्हीची चाचणी घेतली जात आहे.
Mahindra Atom EV
Mahindra Atom EVDainik Gomantak

इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ सातत्याने वाढताना दिसत आहे. टाटा नेहमीच परवडणारी वाहने नागरिकांना देण्याचा प्रयत्न करत असते. नुकतेच टाटाने इलेक्ट्रिक टियागो लाँच करून देशातील ईव्ही क्षेत्रात खळबळ निर्माण केली आहे. महिंद्रा देखील मागील काही दिवसांपासून इलेक्ट्रिक क्षेत्रात पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे. महिंद्राची 4 सीटर अ‍ॅटम इलेक्ट्रिकची सध्या खूप चर्चा होत आहे. कंपनीकडून अॅटम ईव्हीची चाचणी घेतली जात आहे.

Mahindra Atom EV
Muhurat Trading: सोमवारी शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंग, जाणून घ्या 'या' विशेष ट्रेडिंगबद्दल

महिंद्राची 4 सीटर अ‍ॅटम इलेक्ट्रिकच्या फिचर्सची माहिती समोर आली आहे. महिंद्रा अल्ट्रा-कॉम्पॅक्ट अ‍ॅटम इलेक्ट्रिक कार लवकरच लॉन्च करू शकते. अॅटम इलेक्ट्रिक कार दोन बॅटरी पॅक आणि चार विविध प्रकारांसह लॉन्च केली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये K-1, K-2, K-3 आणि K4 असे मॉडेलचे प्रकार असू शकतात. महिंद्रा अॅटम K-1 आणि K-2 प्रकारांना 7.4 kW चा 144 AH बॅटरी पॅक वापरला जाऊ शकतो तर K-3 आणि K-4 प्रकारांमध्ये 11.1 kW चा 216 AH बॅटरी पॅक वापरला जाऊ शकतो.

Mahindra Atom EV
Diwali 2022: दिवाळीत स्वत:ला द्या फाइनेंशियल सिक्योरिटीचे अप्रतिम गिफ्ट, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

महिंद्रा अॅटमचे K1 आणि K2 मॉडेल एका चार्जवर 80 किमीची अंतर कापू शकतात, तर K3 आणि K4 मॉडेल 100 किमीसाठी डिझाइन केले जात आहेत. महिंद्राच्या Atom EV ची नवीन ग्रिल, हेडलॅम्प, मोठी विंडस्क्रीन आणि खिडक्या अशी रचना असेल. अ‍ॅटममधील फ्युचरिस्टिक लुकसाठी चाके, बॉक्सी डिझाइन आणि ब्लॅक-आउट पिलर दिले जाऊ शकतात. महिंद्रा अॅटम भारतात 3 लाखांच्या रेंजपर्यंत उपलब्ध होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com