
Success Story Of Malay Debnath Who Came To Delhi With 100 rs Now Owning Catering Company Of Crores: इतिहास असेच लोक घडवतात जे प्रतिकूल परिस्थितीशी लढून पुढे जातात. मलय देबनाथ हे देखील अशा लोकांपैकी एक आहेत ज्यांनी केवळ 100 रुपयांपासून ते कोट्यवधी रुपयांच्या कॅटरिंग फर्मपर्यंत प्रवास केला आहे.
मलय देबनाथ 1988 मध्ये वयाच्या 19 व्या वर्षी पश्चिम बंगालमधील कूचबिहार जिल्ह्यातील एका खेड्यातून दिल्लीत आले. ते दिल्लीत आले तेव्हा त्यांच्या पाकिटात फक्त 100 रुपये होते.
घरातील आपल्या लहान भावंडांना आणि पालकांना सांभाळण्यासाठी त्यांना काम करण्याची गरज होती. आपल्या मेहनतीमुळे मलयने संपूर्ण देशात करोडोंची मालमत्ता निर्माण केली आहे.
केटरिंग व्यवसायाव्यतिरिक्त, ते सहा रेल्वे गाड्यांमध्ये पेंट्री सांभाळतात. देबनाथ केटरर्स अँड डेकोरेटर्स असे त्यांच्या कंपनीचे नाव आहे.
1935 साल होते जेव्हा देबनाथ यांचे आजोबा पूर्व बंगालमधून पश्चिम बंगालमध्ये आले, ज्याला आता बांगलादेश म्हणून ओळखले जाते. त्यावेळी देबनाथ यांच्या कुटुंबाला समाजात खूप प्रतिष्ठा होती.
विणकामाचा व्यवसाय करणाऱ्या मलय देबनाथ यांच्या आजोबांनी गावातील वंचित मुलांसाठी शाळा बांधण्यासाठी जमीन दान केली होती.
त्यामुळे गावकरी आजोबांना खूप मानायचे. त्यांच्या कुटुंबाचाही तितकाच आदर होता. या शाळेची इमारत आजही त्यांंच्या गावी उभी आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात राजकीय मतभेदामुळे त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी देबनाथ यांच्या विणकामाच्या कारखाण्याला आग लावली. यानंतर त्यांचे कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाले.
कुटुंबाने त्याेचे फर्म पुन्हा सुरू केले पण त्यांना पूर्वीचे वैभव परत मिळवता आले नाही. 1980 च्या दशकाच्या सुरुवातीस त्यांच्या कुटुंबांची परिस्थिती आणखीनच बिकट झाली होती.
देबनाथ, त्यांची मोठी बहीण आणि त्याचे दोन लहान भाऊ शाळेत शिकत होते. कुटुंब गरिबीत जगू लागले. वडील काम शोधू लागले. देबनाथ आपल्या कुटुंबाचा गावात चहाचा छोटासा व्यवसाय पाहत असत.
शाळेत जाण्यापूर्वी आणि तिथून घरी आल्यानंतर तो आपला सगळा वेळ व्यवसायात द्यायचा. बारावी उत्तीर्ण होईपर्यंत हे तीन वर्षे चालू राहिले. यानंतर त्यांनी आपले शिक्षण सोडले. त्यानंतर ते आईकडून 100 रुपये घेऊन मलय दिल्लीला आले.
1980 च्या दशकाच्या सुरुवातीस परिस्थिती आणखीनच बिकट झाली होती. देबनाथ हा आपल्या भावंडांसोबत शाळेत शिकत होते. त्यांचे कुटुंब गरिबीने त्रस्त होते. त्यामुळे एकेकाळी स्वत:चा व्यवसाय करणारे मलयचे वडील आता कामाच्या शोधात लागले. दुसरीकडे, देबनाथनेही शालेय वयापासूनच घरच्या जबाबदाऱ्या सांभाळायला सुरुवात केली.
दिल्लीत पोहोचल्यानंतर देबनाथ यांनी एक केटररकडे काम सुरू केले. कामाच्या वेळेनंतरही त्यांना जादा वेळ करावे लागत होते. त्यांच्याकडे भांडी साफ करण्यास आणि टेबल पॉलिश करण्याची जबाबदारी होती.
मात्र, याचा त्यांना कधीच त्रास झाला नाही. कुठेतरी सुरुवात करायची आहे हे त्यांना माहीत होतं. हे काम कष्टाचे आणि तणावाचे असल्यामुळे त्यांच्या बहुतेक सहकाऱ्यांनी हे काम सोडले. पण, मेहनत आणि निष्ठेमुळे त्यांना मालकाची आपुलकी आणि आदर मिळाला.
वर्षभरानंतर त्यांचा पगार 500 रुपयांवरून 3,000 रुपये करण्यात आला. देबनाथ यांनी घरच्यांना सांभाळण्यासाठी 18 तासांच्या शिफ्टमध्ये काम केले. ओव्हरटाईमचा पैसा ते दिल्लीतील जेवण आणि निवासासाठी वापराचे.
हे सर्व सुरू असतानाच देबनाथ यांनी करिअर बदलले. ते दिल्लीतील एका इव्हेंट मॅनेजमेंट फर्ममध्ये मॅनेजर म्हणून रुजू झाले. याशिवाय त्यांनी आयटीडीसी (इंडियन टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) हा हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम पूर्ण केला.
या इव्हेंट कंपनीत काम करताना देबनाथला खूप एक्स्पोजर मिळाले. ही कंपनी मोठ्या पार्ट्यांचे आयोजन करत असे. या कार्यक्रमांमध्ये त्याने अनेक नवीन मित्रही बनवले.
नंतर त्यांनी मलय देबनाथ यांना त्यांची केटरिंग कंपनी सुरू करण्यास मदत केली. आज त्यांची कंपनी दिल्ली, पुणे, जयपूर, अजमेर आणि ग्वाल्हेरसह 35 हून अधिक आर्मी मेस सर्व्हिसेसमध्ये नियुक्त करण्यात आली आहे.
मलय यांना आता उत्तर बंगालमधील चहाच्या बागांसह सुमारे 200 कोटी रुपयांची संपत्ती कमावली आहे. त्यांच्या दोन मुली पुणे आणि ऑस्ट्रेलियात शिकत आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.