मनोरंजनाचे डिजिटल अवतार: भारतात ऑनलाइन बाजारपेठ वेगाने वाढ

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 24 मार्च 2021

आता भारतीयांच्या मनोरंजनाची साधनेही बदलली आहेत. टीव्ही आणि सिनेमा हॉलसारख्या लोकप्रिय माध्यमांऐवजी बहुतेक लोक इंटरनेटवर आधारित डिजिटल माध्यमांकडे वळले आहेत.

नवी दिल्ली: आता भारतीयांच्या मनोरंजनाची साधनेही बदलली आहेत. टीव्ही आणि सिनेमा हॉलसारख्या लोकप्रिय माध्यमांऐवजी बहुतेक लोक इंटरनेटवर आधारित डिजिटल माध्यमांकडे वळले आहेत. 2020 मध्ये, इंटरनेट स्ट्रीमिंगद्वारे ओव्हर द टॉप (ओटीटी) प्लॅटफॉर्मवर टीव्ही कार्यक्रम आणि चित्रपट पाहण्याच्या बाजारपेठेत 35% वाढ झाली.

गाणी ऐकणा्यांनी अ‍ॅपचा वापर वाढविला. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर एमएमओ गेम्सचा पूर आला आहे, ज्यात कोट्यावधी भारतीय सहभागी होऊ लागले आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ग्राहकांची संख्या तीस दशलक्षांवर गेले आणि कमाई अडीच पट वाढली. मार्च 2020 मध्ये देशात ओटीटीचे 2.20 कोटी ग्राहक होते, जे जुलै 2020 पर्यंत 2.90  कोटींवर पोहचले. 2019 मध्ये या प्लॅटफॉर्मचे सबक्रिप्शन घेणारे ग्राहक केवळ 10% होते, तर 2020 मध्ये ते 25% पर्यंत पोहोचले आहे. महिन्यातील डीटीएचच्या चार-पाचशे रुपयांच्या प्लॅनच्या तुलनेत बहुतेक नागरिकांनी वार्षिक ओटीटीवर समान किंमतीचे पॅकेज निवडणे सुरू केले आहे.

पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याच्या हालचाली? वाचा निर्मला सीतारमण काय म्हणाल्या 

 चित्रपट स्ट्रीमिंग

2020 च्या मार्च मध्ये सिनेमा घरे बंद झाले होते, पण दर्शकांना त्या काळातही नऊ नवीन चित्रपट पाहायला मिळाले होते. त्यांना ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीमिंग केले गेले होते. आणि आता 2021 मध्ये 19 नवीन चित्रपट आणि टीव्ही शो थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केले जाणार आहे. म्हणजेच लोकांना करमणुकीसाठी मल्टिप्लेक्समध्ये जावे लागणार नाही.

प्रमुख प्लॅटफॉर्म आणि सब्सक्राइबर्स

प्लॅटफॉर्म    सदस्य    2019 

  • डिस्नी हॉटस्टार    1.86 कोटी    53.6 लाख
  • अ‍ॅमेझॉन प्राइम    58.3 लाख    43.4 लाख
  • नेटफ्लिक्स         30.8 लाख    2 लाख
  • सोनिलीव्ह         27 लाख       १ .9 लाख
  • जी 5               18.1 लाख    6.5 लाख

ऑनलाइन गेमिंग, 300 दशलक्ष खेळाडू

आर्थिक वर्ष 2019 मध्ये लॉकडाउनपूर्वी जवळपास 300 दशलक्ष ऑनलाइन गेमिंग खाती तयार केली गेली होती. गेमिंग इंडस्ट्रीने घरात कैद केलेल्या लोकांच्या गरजेचा फायदा घेऊन मॅसिव्ली मल्टीप्लेअर ऑनलाईन (एमएमओ) गेम सुरू केले.

याचा परिणाम म्हणून, नॉर्टनलाइफ लॉक एजन्सीद्वारे सर्वेक्षण केलेल्या 59 टक्के लोकांनी मोबाइल गेममध्ये व्यस्त असल्याचे कबूल केले. यापैकी 1965 ते 1980 दरम्यान जन्मलेल्या जनरेशन-एक्स मधील 92 टक्के लोकांनी ऑनलाइन गेमिंगमध्ये वेळ घालविण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणून पाहिले.

ऑनलाईन म्युझीक 

2020 मध्ये म्युझीक एकणाऱ्यांची संख्या 40 टक्क्यांनी वाढली आहे, 2020 मध्ये भारतीयांकडून ऑनलाईन म्युझीक  ऐकण्याचा ट्रेंड 40 टक्क्यांनी वाढला आहे. रेकॉर्डिंग उद्योग वितरकांचा विश्वास असलेल्या इंडियन म्युझिक इंडस्ट्रीने डिसेंबरमध्ये बातमी दिली की चित्रपट  गीताएवजी बरेच अल्बम सॉंग या काळात एकले गेले.

लोक घरातील कामे करीत असताना ही गाणी ऐकायला साधारण दीड ते दोन तास वेळ देत असत. बरेच मोबाइल आणि डेस्कटॉप अ‍ॅप्स लाँच केले गेले होते आणि जे आधीपासून चालू होते पण त्यांनी कोरोना काळात ही सेवा आणि अ‍ॅप्सची वैशिष्ट्ये अधिक वाढविली आहे.
विशेष म्हणजे या अ‍ॅप्सवर स्वतंत्र संगीतकार आणि गायकांचे काम नागरिकांपर्यंत सहज पोहोचू लागले आहे.
2019 मध्ये, सर्वाधिक ऐकल्या गेलेल्या 100 हिंदी गाण्यांमध्ये 40 गाणी विना-चित्रपट होते. 2020 दरम्यान ही संख्या 65 वर पोहोचली. त्याचप्रमाणे प्रादेशिक भाषा आणि शैलीतील संगीताचा वाटा 33 टक्क्यांवरून 39 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. २०२० पर्यंत ऑनलाइन संगीत बाजारपेठ जवळपास दोन हजार कोटींवर पोचले असून, वार्षिक 8 ते10% दराने वाढ होण्याचा अंदाज आहे.

अ‍ॅपवर म्युझीक
                मार्केट शेअर    

  • गाणा                    30%
  • जिओसावन           24%
  • विंक म्युझीक         15%
  • स्पॉटिफाई            15%
  • गूगल प्ले म्युझीक    10%

संबंधित बातम्या