दिवाळीत घ्या नवीन 'कार'.. मारूती देत आहे ५० हजारांपेक्षा जास्त सूट

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

मारुती सुजुकीच्या अशा कारबद्दल माहिती देणार आहोत ज्यांवर या महिन्यात 50 हजारांपेक्षा जास्त डिस्काउंट ऑफर देत आहे.

नवी दिल्ली- दसरा झाला की दिवाळीचे वेध लागतात. या सणासुदीच्या हंगामात अनेक जण नवनवीन वस्तू घेण्याच्या विचारात असतात. यातील बरेच लोक हे नवीन गाडी खरेदी करणारेच असतात. मागील काही वर्षांपासून मारुती सुजुकी ही भारतातील एक प्रसिध्द ऑटोमोबाईल कंपनी आहे. मारुती सुजुकीच्या प्रत्येक प्रकारच्या कार आहेत आणि त्या प्रसिध्दही आहेत. या वर्षी कंपनी त्यांच्या भरपूर कारवर डिस्काउंट देत आहे. या लेखात आम्ही तुम्हाला मारुती सुजुकीच्या अशा कारबद्दल माहिती देणार आहोत ज्यांवर या महिन्यात 50 हजारांपेक्षा जास्त डिस्काउंट ऑफर देत आहे.

मारुती सियाज- ₹59,200 वर डिस्काउंट-

मारुतीची ही कार खरेदी करणे ग्राहकांना मोठे फायदाचे ठरु शकेल. या कार वर ग्राहकांना ऑक्टोबर 2020 मध्ये 59 हजार 200 रुपये वाचवू शकता. तसेच या कारचा टॉप ट्रिमच्या खरेदीवर ग्राहकांना 49 हजार 200

रुपये डिस्काउंट मिळत आहे. 

मारुती डिजायर (प्री-फेसलिफ्ट) - ₹57,000 वर डिस्काउंट-
काही दिवसांपुर्वी कंपनीने या कारचा फेसलिफ्ट वर्जन लॉन्च केला होता. या महिन्यात जर तुम्ही प्री फेसलिफ्ट वर्जन घ्यायचा विचार करत असाल तर त्यात ग्राहक 57 हजार वाचवू शकतात. तर फेसलिस्ट वर्जनवर ग्राहक 42 हजार रुपये बचत करु शकते. 

​मारुती एस-प्रेसो- ₹52,000 वर डिस्काउंट-

ही कंपनीची छोटी एसयूव्ही कार कंपनीने मागील वर्षी लॉन्च केली होती. या कारला ऑक्टोबर महिन्यात 52 हजारांच्या डिस्काउंटवर खरेदी केली जाऊ शकते. देशात या कारची टक्कर रेनॉ क्विड या कारशी केली जात आहे.

संबंधित बातम्या