मारुती सुझुकीच्या ऑफर्सने देशभरात धुमाकूळ

फॅमिली कारवर मिळत आहे धमाकेदार सूट
S-Cross
S-Cross Dainik Gomantak

अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या आपल्या वाहन विक्रीत वाढ व्हावी अथवा अधिक खप व्हावा या उद्देशाने वेगवेगळ्या अनेक ऑफर्स ग्राहकांसमोर ठेवत ग्राहकांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करतात. याच पार्श्वभूमीवर देशातील सर्वात मोठी वाहन कंपनी मारुती सुझुकी आपल्या वाहनांवर बंपर डिस्काउंट ठेवला आहे. (Maruti Suzuki's offers are all over the country )

या कार खरेदी केल्यास ग्राहकाला मोठा नफा मिळू शकणार आहे. म्हणूनच मारुती सुझुकीच्या ऑफर्सने देशभरात धुमाकूळ घातला असून, त्यामुळे ऑटो मार्केटमध्ये ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. कंपनीची ऑफर देण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही अशा अनेक योजना समोर आल्या आहेत, ज्यानंतर खरेदीत लक्षणीय वाढ झाली आहे.

S-Cross
जिओने दिला मोठा झटका! या प्लॅनसाठी यूजर्संना द्यावे लागणार अधिक पैसे

मारुती इग्निसवर नेमका किती आहे डिस्काउंट

मारुती सुझुकीचे पॉवरफुल वाहन इग्निस ही सर्वोत्तम कार मानली जाते. क्रॉसओवर हॅचबॅक मारुती इग्निसवर या महिन्यात 23,000 रुपयांची सूट मिळत आहे. तथापि, ही ऑफर केवळ मॅन्युअल ट्रान्समिशन प्रकारावर उपलब्ध आहे. याशिवाय या कारवर 4,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट आणि एक्सचेंजवर 10,000 रुपयांचा बोनस देखील उपलब्ध आहे. अशा प्रकारे, कंपनी इग्निसवर एकूण 37,000 रुपयांची सूट देत आहे.

सेडान सियाझवर जोरदार ऑफर

मारुतीच्या आलिशान सेडान सियाझवर रोख सवलत नाही, पण या कारवर एक्सचेंज ऑफर नक्कीच आहे. तुम्ही Ciaz एक्सचेंज केल्यास, तुम्हाला रु. 25,000 चा आरामदायी बोनस मिळेल. याशिवाय जून महिन्यात या कारवर पाच हजार रुपयांची कॉर्पोरेट सूटही दिली जात आहे.

S-Cross
काम झालं सोप्प! e-wallet च्या मदतीने काढा ATM मधून पैसे

S-Cross वर या कारवर डिस्काउंट देखील सवलत उपलब्ध

मारुती सुझुकीचे शक्तिशाली वाहन S-Cross वर या महिन्यात रोख सवलत मिळत आहे. जून महिन्यात या कारवर 12,000 रुपयांची सूट दिली जात आहे. तसेच, त्याच्या एक्सचेंजवर 25,000 चा बोनस दिला जात आहे. याशिवाय, एस-क्रॉसवर 5,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देखील उपलब्ध आहे.

मारुती बलेनोवर मात्र कोणतीही सूट नाही

त्याच वेळी, मारुती बलेनोवर सध्या कोणतीही सूट नाही. कंपनीने या वर्षाच्या सुरुवातीला मारुती बलेनो अपडेट केली होती. यामुळे, आत्तापर्यंत कदाचित यावर कोणतीही ऑफर उपलब्ध नाही. याशिवाय मारुती XL6 वर या महिन्यात कोणतीही ऑफर नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com