Sandhya Devanathan: संध्या देवनाथन मेटा इंडियाच्या प्रमुख, संध्या यांच्याशी संबंधित पाच गोष्टी

मार्क झुकरबर्ग यांच्या मेटा इंडियाच्या उपाध्यक्षपदी संध्या देवनाथन नियुक्ती झाली आहे.
Sandhya Devanathan
Sandhya DevanathanDainik Gomantak

मार्क झुकरबर्ग यांच्या मेटा इंडियाच्या (Meta India) उपाध्यक्षपदी संध्या देवनाथन (Sandhya Devanathan) नियुक्ती झाली आहे. देवनाथन 1 जानेवारी 2023 पासून पदभार स्वीकारतील. आंध्र विद्यापीठातून 1998 साली अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर संध्या यांनी दिल्ली विद्यापीठातून एमबीए केले. 2014 मध्ये त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या बिझनेस स्कूलमधून शिक्षण घेतले आहे.

(Meta Platforms Appoints Sandhya Devanathan As India Head)

Sandhya Devanathan
Daljit Kaur Death: प्रसिद्ध पंजाबी अभिनेत्रीचे निधन; पंजाबीसह, हिंदी सिनेसृष्टीही हळहळली

1) देवनाथन यांनी 2016 पासून META साठी काम सुरू केले. संध्या देवनाथन यांनी सिंगापूर आणि व्हिएतनाममधील व्यवसाय तसेच, दक्षिणपूर्व आशियामध्ये मेटाच्या ई-कॉमर्स उपक्रमसाठी काम केले.

2) संध्या देवनाथन 1 जानेवारी 2023 पासून आपला पदभार स्वीकारतील. मेटा एशिया-पॅसिफिक क्षेत्र (APAC) चे उपाध्यक्ष डॅन नेरी याबाबत त्यांना जबाबदारी सोपवतील. तसेच, त्यांनाच त्या रिपोर्ट देखील करतील.

Sandhya Devanathan
Sunny Leone's Bold Photoshoot: सनीचा वाईल्ड पोशाखातील घायाळ करणारा बोल्ड फोटोशूट

3) भारतातील मेटाचा दीर्घकालीन व्यवसाय वाढीच्या दृष्टीने संध्या देवनाथन काम करणार आहेत. त्यासाठी मेटाचे भागीदार आणि ग्राहक यांच्यावर लक्ष केंद्रित करणे त्यांची प्राथमिकता असेल. व्यवसाय आणि नफा यांची देखील जबाबदारी त्याच्याकडे असेल.

4) संध्या देवनाथन यांना बँकिंग, पेमेंट्स आणि तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रात वीस वर्षाहून अधिक अनुभव आहे. 2016 पासून त्यांनी META साठी काम सुरू केले.

5) संध्या देवनाथन यांच्याकडे मेटासाठी देशातील नामांकित ब्रँड, निर्माते, जाहिरातदार यांच्याशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याची जबाबदारी असेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com