Microsoft Layoff: मायक्रोसॉफ्टच्या कर्मचाऱ्यांना मोठा झटका, कंपनी 11,000 लोकांना देणार नारळ!

जगातील आघाडीची टेक कंपनी मायक्रोसॉफ्ट (Microsoft layoff News) ने ही हजारो कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय घेतला आहे.
 Microsoft News Updates
Microsoft News UpdatesDainik Gomantak

Microsoft Layoff: आयटी क्षेत्रात कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या सातत्याने जात आहेत. जगातील आघाडीची टेक कंपनी मायक्रोसॉफ्ट (Microsoft layoff News) ने ही हजारो कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. इंजिनीअरिंग विभाग आणि एचआर विभागातून ही टाळेबंदी केली जाणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. कंपनी 5 टक्के कर्मचाऱ्यांना म्हणजे सुमारे 11,000 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवू शकते. मात्र याबाबत कंपनीकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

मोठ्या प्रमाणावर छाटणी होऊ शकते

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जागतिक परिस्थिती पाहता कंपनी कर्मचाऱ्यांना (Employees) कामावरुन कमी करु शकते. कंपनी आपल्या एचआर विभागातील सुमारे एक तृतीयांश लोकांना वगळू शकते. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, मागील वर्षांच्या तुलनेत ही टाळेबंदी खूप मोठी असू शकते.

 Microsoft News Updates
Amazon Lay Off: Twitter, Meta अन् Microsoft नंतर Amazon मध्ये 10,000 कर्मचाऱ्यांची कपात, 'हे' आहे मोठं कारण

कर्मचाऱ्यांची संख्या किती आहे?

कर्मचार्‍यांच्या आकडेवारीबद्दल बोलायचे झाल्यास, 30 जून 2022 पर्यंत कंपनीकडे 2,21,000 लोक होते. यापैकी 1,22,000 कर्मचारी अमेरिकेत कार्यरत आहेत. त्याचवेळी, 99,000 कर्मचारी इतर देशांमध्ये काम करत आहेत.

पर्सनल कम्प्यूटरची सेल कमी झाली

रॉयटर्सच्या अहवालानुसार, गेल्या अनेक तिमाहींमध्ये पर्सनल कम्प्यूटरच्या विक्रीत घट झाली आहे. यासोबतच विंडोज आणि इतर उपकरणांच्या विक्रीतही घट झाली असून त्याचा थेट परिणाम कंपनीवर झाला आहे.

 Microsoft News Updates
Microsoft Teams Down: हजारो वापरकर्त्यांसाठी मायक्रोसॉफ्ट टीम्स डाउन

कंपनीने आधीच टाळेबंदी केली आहे

गेल्या वर्षी जुलैमध्येही कंपनीने अनेक कर्मचाऱ्यांना काढून टाकले होते. त्याचवेळी, ऑक्टोबर महिन्यात कंपनीने न्यूज वेबसाइट Axios ला सांगितले की, कंपनीने सुमारे 1000 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले आहे.

अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची योजना आखत आहेत

Amazon, Meta, Twitter यासह अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची योजना आखत आहेत. यासोबतच गुगलही मोठ्या प्रमाणावर टाळेबंदी करण्याचा विचार करत असल्याची बातमी समोर आली आहे. जागतिक बाजारात सध्या आलेल्या मंदीमुळे आयटी कंपन्या हा निर्णय घेत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com