PIB Fact Check: देशातील करोडो तरुणांना मोदी सरकार देणार मोफत लॅपटॉप, सरकारने दिली 'ही' मोठी अपडेट!

Free Laptop Scheme: या व्हायरल नोटीसमध्ये भारत सरकार तरुणांना मोफत लॅपटॉप देत असल्याचा दावा केला जात आहे.
Free Laptop Scheme
Free Laptop SchemeDainik Gomantak

PM Free Laptop Scheme 2023: डिजिटल इंडिया मिशनमुळे स्मार्टफोन आणि लॅपटॉप ही प्रत्येक व्यक्तीची गरज बनले आहे. यापूर्वी विविध राज्य सरकारांच्या वतीने टॅब्लेट आणि लॅपटॉपचे वाटपही करण्यात आले आहे.

सध्या सोशल मीडियावर एक नोटीस व्हायरल होत आहे. या व्हायरल नोटीसमध्ये भारत सरकार तरुणांना मोफत लॅपटॉप देत असल्याचा दावा केला जात आहे.

दावा पूर्णपणे बनावट असल्याचे आढळले

'पंतप्रधान मोफत लॅपटॉप योजना 2023' अंतर्गत लॅपटॉप दिले जात असल्याचा दावा मेसेजमध्ये केला जात आहे. पण सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असलेल्या या दाव्याची PIB फॅक्ट चेक केली असता, हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे दिसून आले. जर तुम्हाला असा काही मेसेज आला असेल तर तुम्हाला त्याची वास्तविकता कळायला हवी.

Free Laptop Scheme
Free Ration Scheme: मोफत राशन घेणाऱ्यांना लागली लॉटरी, सरकारने बदलले नियम

अशी कोणतीही योजना राबविली जात नाही

व्हायरल होत असलेल्या मेसेजचे पीआयबी फॅक्ट चेक केल्यानंतर वास्तव समोर आले. फॅक्ट चेकच्या आधारे शिक्षण मंत्रालयाकडून अशी कोणतीही योजना सुरु नसल्याचे सांगण्यात आले. सरकारचे अधिकृत तथ्य तपासक 'पीआयबी फॅक्ट चेक' ने लोकांना असा कोणताही दिशाभूल करणारा मेसेज फॉरवर्ड करु नये असे सांगितले आहे.

दिशाभूल करणारे मेसेज फॉरवर्ड करण्यास मनाई आहे

सरकारचे अधिकृत तथ्य तपासक 'पीआयबी फॅक्ट चेक' ने लोकांना असा कोणताही दिशाभूल करणारा मेसेज फॉरवर्ड करु नये असे सांगितले आहे. हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे पीआयबी फॅक्ट चेकने वरील मेसेजमध्ये सांगितले होते. असा कोणताही आदेश शासनाने दिलेला नाही.

Free Laptop Scheme
Free Ration Scheme: मोफत राशन घेणाऱ्यांचे बल्ले-बल्ले, सरकारने जारी केला नवा अध्यादेश

काय आहे व्हायरल मेसेजमध्ये?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मेसेजमध्ये शिक्षण मंत्रालय तरुणांना मोफत लॅपटॉप देण्याचा दावा करत आहे. या नोटीसमध्ये असे लिहिले आहे की, इयत्ता 11, 12, BA च्या प्रत्येक सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांना (Students) 'पंतप्रधान मोफत लॅपटॉप योजना 2023' अंतर्गत लॅपटॉप दिले जातील. यात लॅपटॉपच्या फीचर्सचाही उल्लेख आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com