Sukanya Samriddhi Yojana: PPF-सुकन्या समृद्धीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच...

PPF Interest Rate: सरकारच्या छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे.
Sukanya Samriddhi Yojana
Sukanya Samriddhi YojanaDainik Gomantak

Small Saving Schemes Interest Rate: तुम्ही सुकन्या समृद्धी योजना (SSY), PPF, किसान विकास पत्र (KVP) किंवा नॅशनल सेव्हिंग्ज कार्ड (NSC) मध्ये भविष्याचा विचार करुन गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सरकारच्या छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे. याची घोषणा खुद्द अर्थमंत्री करणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी डिसेंबरच्या अखेरीस अर्थ मंत्रालयाकडून छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात वाढ करण्यात येणार आहे.

आरबीआयने रेपो दरात पुन्हा वाढ केली

सरकारकडून व्याजदरात वाढ केल्यानंतर अल्पबचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. नवीन व्याजदर सरकार 1 जानेवारीपासून लागू करणार आहे. चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरबीआयने (RBI) रेपो दरात पुन्हा एकदा वाढ केली आहे. यावेळी मध्यवर्ती बँकेने रेपो रेटमध्ये 35 बेसिस पॉईंट्सची वाढ केल्याने तो 6.25 टक्क्यांवर पोहोचला आहे.

Sukanya Samriddhi Yojana
Sukanya Samriddhi Yojana: सुकन्या समृद्धी योजनेत सरकारने केले 5 मोठे बदल, माहित नसेल तर...

व्याजदरात 70 बेसिस पॉइंट्सने वाढ होऊ शकते

मे महिन्यापासून आतापर्यंत रिझर्व्ह बँकेने पाच वेळा व्याजदरात 2.25 टक्के वाढ केली आहे. मात्र या काळात सरकारकडून अल्पबचत योजनेत कोणतीही वाढ झाली नाही. अशा परिस्थितीत, सूत्रांचा दावा आहे की, पुनरावलोकनाच्या आधारावर, नवीन व्याजदर 31 डिसेंबर किंवा त्यापूर्वी जाहीर केले जातील. परंतु 1 जानेवारी 2023 पासून ते लागू केले जाईल. व्याजदरात 60 ते 70 बेसिस पॉइंट्सने वाढ होण्याची शक्यता आहे.

दर तीन महिन्यांनी बचत योजनेचा आढावा घेतला जातो

केंद्र सरकारकडून अल्पबचत योजनेवर मिळणाऱ्या व्याजाचा प्रत्येक तिमाहीत आढावा घेतला जातो. या आधारे व्याजदर वाढवण्याचा किंवा कमी करण्याचा निर्णय घेतला जातो. शेवटच्या तिमाहीत, 30 सप्टेंबर रोजी, वित्त मंत्रालयाकडून सांगण्यात आले की, ऑक्टोबर-डिसेंबरसाठी ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर 7.6 टक्के व्याज दिले जाईल. किसान विकास पत्रावरील व्याजातही 10 बेसिस पॉइंट्सने वाढ करण्यात आली आहे.

Sukanya Samriddhi Yojana
Sukanya Samriddhi Yojana: या योजनेचा लाभ घेऊन करा तुमच्या मुलीचे भविष्य सुरक्षित

तसेच, सध्या पीपीएफवर 7.1 टक्के वार्षिक व्याज उपलब्ध आहे. त्याचवेळी, सुकन्या समृद्धी योजनेत (SSY) गुंतवणूक (Investment) करणाऱ्यांना 7.6 टक्के दराने व्याज मिळते. कोणत्याही लहान बचत योजनेत हे सर्वाधिक व्याज उपलब्ध आहे. राष्ट्रीय बचत आवर्ती ठेव खात्यावर 5.8 टक्के व्याज उपलब्ध आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com