PM Maandhan Yojana: मोदी सरकार देणार दरमहा 3000 रुपये पेन्शन, असे करा रज‍िस्‍ट्रेशन

PM Maandhan Yojana: या योजनेतर्गंत असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या 60 वर्षांवरील लोकांना पेन्शनची सुविधा मिळणार आहे.
Farmer
FarmerDainik Gomantak

Pradhanmantri Maandhan Yojana: देशातील असंघटित कामगारांसाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना (PM Maandhan Yojana) भेट दिली आहे. या योजनेतर्गंत असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या 60 वर्षांवरील लोकांना पेन्शनची सुविधा मिळणार आहे. त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पेन्शन सुरु करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत दरमहा किमान तीन हजार रुपये दिले जातील. पेन्शन दरम्यान व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, अशा परिस्थितीत लाभार्थीच्या पत्नीला किंवा पतीला पेन्शनच्या 50 टक्के रक्कम मिळेल.

मासिक उत्पन्न 15 हजारांपर्यंत असावे

या योजनेचा लाभ अशा लोकांना मिळणार आहे, जे दरमहा 15 हजार रुपयांपर्यंत कमावतात. तसेच, योजनेत सामील होणाऱ्या व्यक्तीचे वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे. या योजनेअंतर्गत तुम्ही पेन्शन योजनेत जी रक्कम जमा कराल, तीच रक्कम सरकारही जमा करेल. यामध्ये 55 ते 200 रुपये जमा करता येतील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमची नोंदणी करणे अनिवार्य असेल.

Farmer
PM Kisan Yojana: करोडो शेतकऱ्यांना मिळणार नवीन वर्षाची भेट, मिळू शकतो 13 वा हप्ता

बँक खाते, आधार कार्ड आवश्यक

या योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीकडे आधार कार्ड (Aadhar Card) आणि बँक खाते असणे बंधनकारक असेल, तरच त्याला त्याचा लाभ मिळू शकेल. यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या सीएसीशी संपर्क साधावा लागेल. सदर योजनेची नोंदणी कुठे केली जाते. नोंदणीच्या वेळी आधार कार्ड, बँक (Bank) खात्याची संपूर्ण माहिती द्यावी लागेल. यानंतर तुमचा बायोमेट्रिक डेटा रेकॉर्ड केला जाईल. यासोबतच तुम्हाला तिथे एक कार्डही उपलब्ध करुन दिले जाईल. यामध्ये श्रम योगी पेन्शन कार्ड क्रमांक दिला जाईल. भविष्यात, तुम्ही फक्त या नंबरद्वारे तुमच्या खात्याबद्दल माहिती गोळा करु शकाल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com