Nitin Gadkari: नितीन गडकरींना काँग्रेस सरकारचे आवडले 'हे' काम, म्हणाले...

Modi Minister Nitin Gadkari: केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना छत्तीसगड सरकारचा एक उपक्रम आवडला आहे.
Nitin Gadkari
Nitin GadkariDainik Gomantak

Modi Minister Nitin Gadkari: केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना छत्तीसगड सरकारचा एक उपक्रम आवडला आहे. मोदी सरकारमधील मंत्री आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाणारे नितीन गडकरी यांनी भूपेश बघेल (Bhupesh Baghel) सरकारचे जाहीरपणे कौतुक केले आहे. प्रत्युत्तरात बघेल यांनी गडकरींचे आभार मानले आणि त्यांचे कौतुकही केले.

दरम्यान, शेणापासून बनवलेल्या नैसर्गिक रंगाचा वापर केल्याबद्दल गडकरींनी बघेल सरकारचे कौतुक केले. ते म्हणाले की, 'मी एमएसएमई मंत्री असताना याची सुरुवात केली होती.' गडकरींनी ट्विट करत म्हटले की, “मी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल जी यांचे अभिनंदन करतो. छत्तीसगडच्या सरकारी विभागीय बांधकामांमध्ये शेणापासून बनवलेल्या नैसर्गिक रंगाचा वापर करण्याचे त्यांनी आवाहन केले. त्यांचा हा निर्णय कौतुकास्पद आणि स्वागतार्ह आहे.'

Nitin Gadkari
Nitin Gadkari: वाहन चालकांसाठी गडकरींची मोठी घोषणा, तुम्हीही आनंदाने माराल उड्या

दुसऱ्या ट्विटमध्ये गडकरींनी लिहिले की, “मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एमएसएमई मंत्री असताना याची सुरुवात केली होती. नैसर्गिक रंगाच्या वापरामुळे पर्यावरणाचे संरक्षण तर होईलच, शिवाय शेतकऱ्यांना (Farmer) रोजगाराची नवी संधी मिळेल, ज्याचा फायदा देशातील शेतकऱ्यांना होईल. बघेल यांनी नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचे आभार मानून त्यांचे कर्मयोगी असे वर्णन केले आहे.

Nitin Gadkari
Nitin Gadkari: कार-बाईकस्वारांसाठी गडकरींची मोठी घोषणा! ऐकून व्हाल थक्क

तसेच, भूपेश बघेल यांनी ट्विट केले की, “खूप खूप धन्यवाद! आदरणीय नितीन गडकरी जी. छत्तीसगड सरकारचा हा कर्मयोग फक्त एक "कर्मयोगी" समजू शकतो. केवळ शब्दांनी नव्हे, तर चांगल्या हेतूने देश आणि राज्य इतरांसाठी प्रेरणादायी ठरते. गाय आणि श्रमाचा आदर हा गांधींचा मार्ग आहे. त्यावर आम्ही पुढे जात आहोत.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com