रेल्वेची 'आई'ला खास भेट, प्रवासात केली जाईल 'बेबी बर्थ'ची सोय

या डब्यात महिला प्रवाशांच्या नवजात शिशूसाठी बेबी सीट जोडण्यात आली आहे.
रेल्वेची 'आई'ला खास भेट, प्रवासात केली जाईल 'बेबी बर्थ'ची सोय
Railway Baby BerthIndian Railway

यावर्षी मदर्स डेच्या निमित्ताने, भारतीय रेल्वेने महिला प्रवाशांसाठी एक महत्त्वाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या अंतर्गत ज्या महिलांना लहान मुले आहेत त्यांच्यासाठी लखनऊ ते दिल्ली दरम्यान धावणाऱ्या लखनऊ मेल ट्रेनमध्ये एक पूर्ण थर्ड एसी कोच महिलांसाठई राखीव ठेवण्यात आला आहे. या डब्यात महिला प्रवाशांच्या नवजात शिशूसाठी बाळाची सीट जोडण्यात आली आहे.

याच्या मदतीने महिला आपल्या मुलाला त्यांच्यासोबत ट्रेनच्या सीटवर सहज झोपवू शकतील. जर एखाद्या महिलेला ही बेबी सीट हवी असेल, तर आरक्षण करताना तिला या सुविधेची गरज आरक्षण फॉर्मवर नमूद करावी लागेल. यानंतर तुम्हाला ही सीट उपलब्धतेच्या आधारावर मिळेल.

Railway Baby Berth
भारतीय रेल्वेने केल्या 1100 गाड्या रद्द | Indian Railway cancels 1100 trains | Gomantak Tv

जेव्हा तुम्हाला बाळ नसेल किंवा तुमच्या बाळाला झोपायचे नसेल तर ही सीट तुम्ही सहज दुमडली जाऊ शकते. यानंतर ती सीट सामान्य सीटसारखी होईल. जेव्हा त्या सीटचा वापर करायचा असेल तर पुन्हा ती सीट काढून तुम्ही त्याचा वापर करू शकता. बेबी बर्थ पूर्णपणे सुरक्षित राहावा यासाठी रेल्वेने स्लाइडर लॉकची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

Railway Baby Berth
सरकार क्रिप्टोकरन्सी व्यवहारांवरील TDS कमी करणार का?

हे सॉफ्टवेअर अद्याप अधीकृत वेबसाईटवर अपलोड झाले नसल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. फक्त टीटीलाच या सीटची माहिती आहे, जी बोलून बदलली जाऊ शकते. सध्या TT कडे या सीटची माहिती आणि अधिकार उपलब्ध माहिती आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.