आता तुमच्या बजेटमध्ये घ्या स्मार्टफोन..!

50MP कॅमेरा आणि जास्त बॅटरी..
Moto G Power 2022
Moto G Power 2022Dainik Gomantak

Moto G Power : Motorola ने आपला Moto G Power 2022 स्मार्टफोन लॉन्च केला असून, हा स्मार्टफोन यूएस मार्केटमध्ये बजेट स्मार्टफोन म्हणून लॉन्च करण्यात आला आहे. हँडसेट सेंटर पंच-होल कटआउट, स्लिम बेझेल आणि मागील माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरसह येतो. डिवाइस मध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. मोटोरोलाच्या या स्मार्टफोनमध्ये कॅप्सूल आकाराचा कॅमेरा मॉड्यूल आहे. कॅमेराच्या मागील बाजूस मोटोरोलाचा लोगो आहे, ज्यामध्ये फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे.

Moto G Power 2022
इंस्टाग्राममध्ये झालेला 'हा' मोठा बदल तुम्हाला माहितेय का?

मोटो जी पॉवर 2022 किंमत

Moto G Power 2022 च्या 4GB + 64GB व्हेरिएंटची किंमत $199 (सुमारे 14,000 रुपये) आहे. त्याच फोनचा आणखी एक प्रकार देखील देण्यात आला आहे जो 4GB रॅम आणि 128GB स्टोरेजमध्ये आहे. 128GB स्टोरेजची किंमत $249 ठेवण्यात आली आहे. भारतीय चलनात, त्याची किमत सुमारे 18,500 रुपये आहे.

मोटो जी पॉवर (2022) चे तपशील

Moto G Power (2022) स्मार्टफोन 1,600 X 720 पिक्सेल रिझोल्यूशन, 20:9 आस्पेक्ट रेशो आणि 90Hz रिफ्रेश रेटसह 6.5-इंचाचा HD+ डिस्प्ले असून, फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्याची मुख्य लेन्स 50MP आहे. याशिवाय फोनमध्ये 2MP मॅक्रो लेन्स आणि 2MP डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 10W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Moto G Power 2022
Paytm चे शेअर्स तब्बल 20% खाली उतरले..!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com