एमएसएमईच्या योजना, कल्पना पोर्टलचे अनावरण

Dainik Gomantak
बुधवार, 6 मे 2020

अधिक वापरकर्त्यासाठी अनुकूल बनविण्यासाठी पोर्टलमध्ये कल्पनेचा टप्पा (संकल्पना, नमुना किंवा व्यावसायिक) दर्शविण्याची सुविधा आहे. कल्पनेशी संबंधित कागदपत्र आणि छायाचित्र आणि समाज माध्यम दुवे देखील अपलोड केले जाऊ शकतात.

नवी दिल्ली

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर येथून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग एमएसएमईचे योजना, कल्पना, नवोन्मेष आणि संशोधनात्मक संग्रह असलेले पोर्टल (http://ideas.msme.gov.in/) सुरू केले. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय, एमएसएमईचे राज्यमंत्री प्रतापचंद्र सारंगी, एमएसएमईचे सचिव डॉ अरुण कुमार पांडा आणि डीसी, एमएसएमईचे उपायुक्त राम मोहन मिश्रा आणि अन्य वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. केंद्र, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकारच्या सर्व योजना या पोर्टलमध्ये समाविष्ट आहेत. त्यात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातील कल्पना, नवोन्मेष आणि संशोधन अपलोड करण्याची तरतूद आहे. हे पोर्टल केवळ विविध मार्गाने कल्पना संकलित करीत नाही तर त्या कल्पनांचे मूल्यांकन आणि प्रतवारी देखील करण्याची वैशिष्ट्यपूर्ण रचना त्यात आहे. हे उद्यम भांडवल, परदेशी सहयोग इत्यादीची सोय देखील करू शकते.

पोर्टलचे महत्त्व सांगतांना गडकरी म्हणाले की हे पोर्टल विशेषतः एमएसएमईसाठी आणि सर्वसाधारण अर्थव्यवस्थेसाठी मोठे परिवर्तनकारी महत्त्व असलेले सिद्ध होईल. ही एक चांगली सुरुवात आहे, असेही  गडकरी म्हणाले. प्रवर्गानुसार वर्गीकरण आणि माहितीचे तसेच कृतीचे विश्लेषण प्रसारित करता येईल जेणेकरून इतरांना या यशस्वी अनुभवातून शिकता येईल. गडकरी यांनी सल्ला दिला की पोर्टल निरंतर आधारावर अद्ययावत ठेवण्यासाठी गुणवत्ताधारक व्यावसायिकांनी हाताळले पाहिजे. ज्ञानाचे संपत्तीमध्ये  रुपांतर होण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. गडकरी म्हणाले की संशोधन, तंत्रज्ञान, नवोन्मेष यावर अधिक काम करण्याची गरज आहे जे खर्च कमी करू शकतील आणि गुणवत्ता सुधारतील.

हे पोर्टल माहिती सामायिकरणातून सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांना मोठ्या प्रमाणात मदत करेल असे मत सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय, एमएसएमईचे राज्यमंत्री प्रतापचंद्र सारंगी यांनी व्यक्त केले. ग्रामीण आदिवासींच्या ज्ञानाचा, कौशल्याचा संशोधन कार्यात उपयोग होईल आणि त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदाविण्यात यामुळे मदत होईल असेही ते म्हणाले. त्याचप्रमाणे हे पोर्टल शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचे नियोजन, उत्पादन, साठवण आणि विपणन करण्यात मदत करू शकते.

ज्या पुरुष/महिला वापरकर्त्यांकडे त्यांच्या कल्पना, नवोन्मेष आणि संशोधन आहे ते वापरकर्ते या व्यासपीठावर ते सामायिक करू शकतात ज्याचा संबंधित अधिकारी आढावा घेतील आणि नंतर ते दर्शकांसाठी प्रकाशित केले जाईल. नोंदणीकृत वापरकर्ते या कल्पनांची प्रतवारी ठरवू शकतात आणि उद्यम भांडवलदार अशा कल्पना, नवोन्मेष आणि संशोधन असलेल्या वापरकर्त्यांशी संपर्क साधू शकतात.

कल्पना, नवोन्मेष आणि संशोधनासाठी ऑनलाईन अर्ज 5-6 मिनिटांत सहज भरता येतील. व्यक्ती (पत / वित्त, मानवी भांडवल विकास, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, विपणन, धोरण इत्यादी) क्षेत्रे निवडू शकतात.

व्यक्ती आपले क्षेत्र (ग्रामीण तंत्रज्ञान नवोन्मेष, टाकाऊतून टिकाऊ, कृषी-प्रक्रिया, उत्पादन, सेवा, खादी, काथ्या इ.) सूचित करू शकते.

अधिक वापरकर्त्यासाठी अनुकूल बनविण्यासाठी पोर्टलमध्ये कल्पनेचा टप्पा (संकल्पना, नमुना किंवा व्यावसायिक) दर्शविण्याची सुविधा आहे. कल्पनेशी संबंधित कागदपत्र आणि छायाचित्र आणि समाज माध्यम दुवे देखील अपलोड केले जाऊ शकतात.

कल्पना, नवोन्मेष आणि संशोधन यांचा व्यवसायीकरणासाठी एकत्रित संग्रह म्हणून या पोर्टलचा संभाव्य उद्योजकांना फायदा होईल. कल्पनांची प्रतवारी सार्वजनिकपणे पाहिली जाऊ शकते जी निर्णय प्रक्रियेत मदत करेल. कल्पना किंवा नवोन्मेष ज्यांच्याकडे आहे अशा व्यक्तींशी किंवा सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांशी उद्यम भांडवलदार संपर्क साधू शकतात. त्याचप्रमाणे भविष्यात बँका, सरकारी प्रयोगशाळा  इनक्यूबेटर, वेगवर्धक, परदेशी सहयोगासाठी पर्याय उपलब्ध आहेत.

 

संबंधित बातम्या