मुकेश अंबानी भारतात बनवणार जगातलं सर्वात मोठ प्राणी संग्रहालय

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) चे मालक मुकेश अंबानी प्राणीसंग्रहालय तयार करणार आहेत.

नवी दिल्ली: देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) चे मालक मुकेश अंबानी प्राणीसंग्रहालय तयार करणार आहेत. अंबानी हे प्राणीसंग्रहालय गुजरातमध्ये बांधणार आहेत. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार जगातील सर्वात मोठ्या प्राणिसंग्रहालयापैकी हे एक असणार आहे. गुजरातमध्येच त्यांचा एक समुह सर्वात मोठे रिफाइनिंग कॉम्प्लैक्स चालवितो.

2023 मध्ये प्राणीसंग्रहालय सुरू होइल

या संदर्भात रिलायन्स कॉर्पोरेट अफेयर्सचे संचालक परिमल नथवाणी म्हणाले की, 2023 मध्ये प्राणीसंग्रहालय सुरू होईल. या प्रकल्पाला स्थानिक सरकार मदत करणार आहे. आणि या स्थानिक सरकारची मदत करण्यासाठी रेस्कयू सेंटर समावेश असणार आहे.

या प्रकल्पासाठी किती खर्च येणार आणि यासंबंधी माहिती देण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे. मुकेश अंबानी यांची एकूण मालमत्ता 80 अब्ज डॉलर्स आहे. ज्यात टेक ते ई-कॉमर्स क्षेत्रापर्यंतचा त्यांचा व्यवसाय आहे. आयपीएलमध्ये खेळत असलेल्या मुंबई इंडियन्स क्रिकेट संघाचे मालक आहेत आणि 2014 मध्ये त्यांनी सॉकर लीग देखील सुरू केली आहे. वाढत्या संपत्तीमुळे त्यांनी आता आपले लक्ष सार्वजनिक उपक्रमांवर वळवले आहे असे म्हटले जात आहे. 2019 मध्ये मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी यांनीही न्यूयॉर्क मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टच्या बोर्डात दाखल झाल्या.

सर्वसामान्यांना पुन्हा मोठा झटका!  पेट्रोल-सिलिंडर बरोबर आता कांदाही रडवणार 

 

 

संबंधित बातम्या