आयकॉनिक ब्रिटीश कंट्री क्लब स्टोक पार्क लवकरच मुकेश अंबानींच्या मालकीचे

गोमंन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

ब्रिटनचा पहिला आयकॉनिक कंट्री क्लब आणि गोल्फ रिसॉर्ट स्टोक पार्क 57 दशलक्ष डॉलर्स म्हणजे 592 कोटी रुपयांमध्ये खरेदी केला आहे. या करारामुळे मुकेश अंबानी हॉटेल व्यवसायात हळूहळू आपला पाय बळकट करत आहेत.

नवी दिल्ली: मुकेश अंबानी यांनी 2019 मध्ये 260 वर्ष जुना ब्रिटीश टॉय स्टोअर चेन हॅमलिस खरेदी केला होता. आता त्यांनी ब्रिटनचा पहिला आयकॉनिक कंट्री क्लब आणि गोल्फ रिसॉर्ट स्टोक पार्क 57 दशलक्ष डॉलर्स म्हणजे 592 कोटी रुपयांमध्ये खरेदी केला आहे. या करारामुळे मुकेश अंबानी हॉटेल व्यवसायात हळूहळू आपला पाय बळकट करत आहेत. या मालमत्तेवर आतापर्यंत किंग कुटुंबाचा कब्जा होता आणि ते  बऱ्याच काळापासून आका चांगल्या खरेदीदाराचा शोधात होते.

स्टोक पार्क हा युरोपमधील सर्वात पॉश गोल्फ कोर्स आहे. जर आपण हॉलिवूड चित्रपट पाहत असाल तर या ठिकाणी कितीतरी चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. बकिंघमशायर येथे असलेले स्टोक पार्क 300 एकरात पसरले आहे. त्यात राहण्यासाठी 49 शयनकक्ष आहेत. याशिवाय स्पा, स्विमिंग पूल, फिटनेस क्लब, जिमसारख्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. 2013 मध्ये, स्टोक पार्क्सला पाच लाल एए स्टार चे  रेटिंग दिले गेले होते. हॉटेल उद्योगात ऑटोमोबाईल असोसिएशनकडून प्राप्त केलेले हे सर्वोच्च रेटिंग आहे. तुम्हाला जर हॉलिवूड चित्रपट पाहण्यात इंट्रेस्ट असेल तर जेम्स बाँड या सिरीजमधील बर्‍याच चित्रपटांचे Goldfinger, Tomorrow Never Dies, Bridget Jones’s Diary, Layer Cake, Wimbledon, Bride & Prejudice सारख्या अनेक चित्रपटाचे शूटींग येथे करण्यात आले आहे.

केंद्र सरकार लसींच्या आयातीवर करणार 10 टक्के कस्टम ड्युटी माफ?

ब्रिटनचा किंग परिवार गेल्या अनेक वर्षांपासून स्टोक पार्क विकायचा प्रयत्न करीत होता. ही मालमत्ता बाजारात आणण्यासाठी आणि त्याच्या विक्रीची शक्यता जाणून घेण्यासाठी किंग परिवाराने 2018 मध्ये सीबीआरई जाहीर केली होती. स्टोक पार्कची कैपेबिलिटी ब्राऊन आणि हम्फ्रे रेप्टन यांनी डिझाइन केली होती. हे खासगी घर जॉर्ज थर्ड आर्किटेक्ट जेम्स वॅट यांनी 1790 ते 1813 च्या दरम्यान बांधले होते. तेव्हापासून ते चित्रपट आणि सेलिब्रिटी मैफिलींसाठी हे लोकप्रिय स्थान राहिले आहे.

संबंधित बातम्या