टॉप १० श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानींची दोन स्थानांनी घसरण

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

शुक्रवारपर्यंत ते या यादीत पाचव्या स्थानावर होते. आज शेअर बाजारात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये सुमारे 5 टक्क्यांची घट झाली. फोर्ब्स रियल टाइम बिलेनियरनुसार सोमवारी RILचे प्रमुख मुकेश अंबानींचं नेट इनकम 3.7 अब्ज डॉलरने कमी झाले आहे.

नवी दिल्ली- जगातील पहिल्या दहा श्रीमंतांच्या यादीत भारतातील रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबांनी यांचा समावेश आहे. उद्योगपती मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. सध्या जाहीर केलेल्या ताज्या यादीत जगभरातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानी सातव्या स्थानावर घसरले आहेत.

शुक्रवारपर्यंत ते या यादीत पाचव्या स्थानावर होते. आज शेअर बाजारात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये सुमारे 5 टक्क्यांची घट झाली. फोर्ब्स रियल टाइम बिलेनियरनुसार सोमवारी RILचे प्रमुख मुकेश अंबानींचं नेट इनकम 3.7 अब्ज डॉलरने कमी झाले आहे. सध्या अंबानींची संपत्ती 74.6 अब्ज डॉलर आहे.
आशियातील सर्वात श्रीमंत मुकेश अंबानी यांना जगभरातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत स्पेस एक्सचे अॅलन मस्क आणि वॉरेन बफेट यांनी मागे टाकले आहे. शुक्रवारी फेसबुकच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्यामुळे मार्क झुकरबर्गची मालमत्ताही घसरली आहे, पण मार्क झुकेरबर्ग 96.7 अब्ज डॉलरसह चौथ्या स्थानावर आहे. या यादीत अॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेजोस प्रथम स्थानावर आहेत.

   श्रीमंत व्यक्ती                              कमाई
1    जेफ बेजोस                             179.4 अब्ज डॉलर
2    बर्नार्ड अर्नाट एंट फॅमिली           113.3अब्ज डॉलर
3    बिल गेट्स                               112.8 अब्ज डॉलर
4    मार्क जुकरबर्ग                         96.7 अब्ज डॉलर
5    एलन मस्क                              87.0अब्ज डॉलर
6    वॉरेन बफेट                             76.2अब्ज डॉलर
7    मुकेश अंबानी                         74.6अब्ज डॉलर
8    लॅरी एलिशन                          74.2अब्ज डॉलर
9    स्टीव बॉल्मर                           71.9अब्ज डॉलर
10    लॅरी पेज                             69.9अब्ज डॉलर

रिअल टाइम बिलियनेयर रॅकींगमध्ये दररोज सार्वजनिक होल्डिंग्जमधील चढउतारांची माहिती मिळत असते. जगाच्या वेगवेगळ्या भागात शेअर बाजार सुरू झाल्यानंतर दर 5 मिनिटांनी निर्देशांक अपडेट केला जातो. ज्यांची मालमत्ता खासगी कंपनीची आहे अशा व्यक्तींची निव्वळ किंमत दिवसून एकदा अद्ययावत केली जाते.

संबंधित बातम्या