मुकेश अंबानी $ 100 अब्जच्या क्लबमध्ये झाले सामील; बेझोस-मस्कच्या गटाचा बनले भाग
Mukesh AmbaniDainik Gomantak

मुकेश अंबानी $ 100 अब्जच्या क्लबमध्ये झाले सामील; बेझोस-मस्कच्या गटाचा बनले भाग

ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार मुकेश अंबानींच्या (Mukesh Ambani) उत्पन्नात $ 23.8 अब्ज एवढी वाढ झाली आहे.

आशियातील सर्वात श्रीमंत मुकेश अंबानी (Mukesh Ambani) 100 अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील झाले आहेत. त्यांची संपत्ती $ 100.6 अब्ज झाली आहे. या संपत्तीसह, ते आता Jeff Bezos आणि Elon Musk यांच्यासह क्लबमध्ये सामील झाले आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार मुकेश अंबानींच्या उत्पन्नात $ 23.8 अब्ज एवढी वाढ झाली आहे. गेल्या 12 महिन्यांत 257 अब्ज डॉलर्ससह वाढत्या शेअर बाजाराने 2021 फोर्ब्सच्या भारतातील 100 श्रीमंतांच्या यादीतील सदस्यांची एकत्रित संपत्ती विक्रमी US $ 775 पर्यंत गेली.

अंबानींनी अलीकडेच त्यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 10 अब्ज गुंतवणूकीसह अक्षय ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये प्रवेश करण्याच्या योजनेची रुपरेषा मांडली आहे. भारतातील 100 श्रीमंत लोकांच्या एकत्रित संपत्तीमधील वाढीचा पाचवा हिस्सा इंफ्रास्ट्रक्चर टाइकून गौतम अदानी यांच्याकडून आला आहे, जे सलग तिसऱ्या वर्षी दुसऱ्या क्रमाकांवर आहेत. अदानी यांची संपत्ती $ 74.8 अब्ज डॉलर्स झाली जी आधी 25.2 अब्ज डॉलर्स होती. त्यांच्या सर्व सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्समध्ये झपाट्याने वाढ झाली.

Mukesh Ambani
डिझेल शंभरीपार तर पेट्रोलचेही दर वाढले, महागाईचा भडका

सॉफ्टवेअरमधील दिग्गज एचसीएल टेक्नॉलॉजीजचे संस्थापक शिव नाडर 31 अब्ज डॉलर्ससह तिसऱ्या स्थानावर आहेत. तंत्रज्ञान क्षेत्रामधून नाडर यांनी 10.6 अब्ज डॉलर्सची संपत्ती कमावली. रिटेलिंग मॅग्नेट राधाकिशन दमानी यांनी चौथ्या स्थानावर कायम असून त्यांची संपत्ती जवळपास 15.4 अब्ज डॉलरवरुन 29.4 अब्ज डॉलर्सनी वाढली आहे.

Related Stories

No stories found.