मुकेश अंबानींच्या रिलायन्सचा आलेख चढताच, 13680 कोटींचा निव्वळ नफा

रिलायन्स इंडस्ट्रीजचा सप्टेंबर 2020 च्या तिमाहीच्या तुलनेत हा नफा 43 टक्क्यांनी वाढला आहे
मुकेश अंबानींच्या रिलायन्सचा आलेख चढताच, 13680 कोटींचा निव्वळ नफा
Mukesh Ambani's Reliance industries net profit hike by 43 percentDainik Gomantak

मुकेश अंबानींच्या (Mukesh Ambani) रिलायन्स इंडस्ट्रीजने (Reliance Industries) कंपनीचे सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 13680 कोटी रुपये झाला आहे . सप्टेंबर 2020 च्या तिमाहीच्या तुलनेत कंपनीचा हा नफा 43 टक्क्यांनी वाढला आहे तर सप्टेंबर 2020 च्या तिमाहीत रिलायन्सचा एकत्रित निव्वळ नफा 9567 कोटी रुपये होता.(Mukesh Ambani's Reliance industries net profit hike by 43 percent)

कंपनीचा ऑपरेटिंग महसूल ही वाढताना दिसत आहे कारण तो आता 1.74 लाख कोटी रुपयेझाला आहे . यात वार्षिक आधारावर 49 टक्के वाढ नोंदवली गेली असून सप्टेंबर 2020 च्या तिमाहीत तो 1.16 लाख कोटी रुपये होता .या वाढीबाबत कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी म्हणाले की, 'चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीची कामगिरी मजबूत झाली आहे. हे सूचित करते की भारतीय आणि जागतिक अर्थव्यवस्था वेगाने सुधारत आहे. ते म्हणाले की किरकोळ विभागातील पुनर्प्राप्ती नेत्रदीपक आहे. यासह, तेलापासून रासायनिक व्यवसायातही चांगली सुधारणा झाली आहे.

Mukesh Ambani's Reliance industries net profit hike by 43 percent
Amazon ही महागलं, प्राइमच्या वार्षिक सबस्क्रिप्शनची किंमत वाढणार

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या सेगमेंट व्यवसायावर लक्ष केंद्रित केले तर O2C व्यवसायासाठी महसूल 58 टक्क्यांनी वाढून तो 1.2 लाख कोटी रुपये झाला आहे गेल्या वर्षी तो 76184 कोटी रुपये होता.

जिओ प्लॅटफॉर्म या बड्या टेलिकॉम कंपनीचा सप्टेंबर तिमाहीत निव्वळ नफा 3728 कोटी रुपये होता. त्यात वार्षिक आधारावर 23 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. गेल्या वर्षी रिलायन्स जिओचा निव्वळ नफा 3019 कोटी रुपये होता. उत्पन्नाबद्दल बोलायचे झाले तर सप्टेंबर तिमाहीत जिओचा महसूल 19777 कोटी रुपये होता. गेल्या वर्षी याच कालावधीत ते 18496 कोटी रुपये होते. APRU तिमाही आधारावर नफा 3.7 टक्के वाढला आहे आणि 143.60 रुपयांवर आहे.

रिलायन्स रिटेलबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीच्या महसुलात 9 टक्के वाढ झाली आहे आणि ती 39926 कोटी रुपये झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ते 36566 कोटी रुपये होते. रिटेलसाठी ईबीआयटीडीए 2913 कोटी होते आणि 45 टक्क्यांची वाढ झाली आहे. किरकोळ विभागाचा निव्वळ नफा 1695 कोटी होता आणि सुमारे 74 टक्के वाढ झाली आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com