नवीन आर्थिक वर्षात तुमच्या पगारावर होणार परिणाम 

दैनिक गोमंतक
सोमवार, 22 मार्च 2021

पुढील महिन्यापासून नवीन कामगार कायदे लागू होणार असल्याने, वेतनश्रेणीमध्ये मोठे बदल होणार आहेत.

नवीन आर्थिक वर्षापासून म्हणजेच 1 एप्रिल 2021 पासून असे अनेक नवीन नियम लागू होणार आहेत, ज्यांचा सामान्य कर्मचारी आणि व्यापारी, निवृत्तीवेतनधारकांवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात परिणाम होणार आहेत. पुढील महिन्यापासून नवीन कामगार कायदे लागू होणार असल्याने, वेतनश्रेणीमध्ये मोठे बदल होणार आहेत. याचा फायदा कर्मचाऱ्यांना पीएफ अर्थात भविष्य निर्वाह निधी मध्ये होणार असल्याचे दिसते. (The new financial year will have an effect on your salary)

येणाऱ्या आर्थिक वर्षात(Financial Year) लागू होणाऱ्या नवीन कामगार कायद्यानुसार, मूलभूत पगाराची रक्कम वाढवून ती एकूण पगाराच्या किमान 50 टक्के एवढी होणार आहे. मूलभूत पगाराच्या रकमेत वाढ झाल्यामुळे, कर्मचाऱ्यांच्या पी.एफ. मध्ये जाणाऱ्या रकमेत वाढ होणार आहे. जेणे करून या रकमेचा कर्मचाऱ्यांना भविष्यात फायदा होईल. तसेच, नवीन आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये पीएफ मधील  2.5 लाखांहून अधिक रकमेवर प्राप्तिकर विभागाअंतर्गत कर लावण्याची तरतूद सुद्धा तरतूद केली गेली आहे. त्यामुळे दरमहा दोन लाख रुपयांहून अधिक उत्पन्न मिळविणाऱ्या कर्मचार्यांवर याचा थेट परिणाम होणार आहे. 

अ‍ॅस्ट्राझेनेकाची लस 100 टक्के प्रभावी; अमेरिकेतील तिसऱ्या टप्प्याचे निष्कर्ष...

दरम्यान, सुट्टीच्या काळात प्रवास करण्यासाठी केंद्र सरकारच्या(Central Government) कर्मचाऱ्यांना तिकिटावर दिली जाणार सूट देखील नव्या आर्थिक वर्षांपासून बंद होणार असून 31 मार्च 2021 पर्यंतच त्याचा लाभ घेता येणार आहे. तसेच, 1 एप्रिलपासून बिझिनेस टू बिझिनेस (बी 2 बी) व्यवसायांतर्गत येणाऱ्या ज्या व्यवसायांची  50 कोटींपेक्षा जास्त उलाढाल आहे, अशा सर्व व्यवसायांसाठी ई-इनव्हॉइस चलन प्रक्रिया बंधनकारक असणार आहे.

संबंधित बातम्या