गाडी घेताय? नोव्हेंबरमध्ये लॅान्च होणार नवी ह्युंदाई i20

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

ह्युंदाई मोटर इंडिया कंपनीची सर्वात लोकप्रिय गाडी असलेल्या ह्युंदाई i20 चं नवं मॅाडेल भारतात लवकरच लॅान्च करण्यात येणार आहे. ही गाडी नोव्हेंबरच्या सुरूवातीला लॅान्च होऊ शकते.

नवी दिल्लीः ह्युंदाई मोटर इंडिया कंपनीची सर्वात लोकप्रिय गाडी असलेल्या ह्युंदाई i20 चं नवं मॅाडेल भारतात लवकरच लॅान्च करण्यात येणार आहे. ही गाडी नोव्हेंबरच्या सुरूवातीला लॅान्च होऊ शकते. नुकताच कंपनीने या गाडीचा पहिला अधिकृत टीजरदेखील प्रकाशित केला आहे.

नव्या i20 ची रचना ह्युंदाई ग्लोबल डिझाइन फिलॉसॉफी ऑफ सेन्स्युअस स्पोर्टनेस द्वारे प्रेरित असून, चार मूलभूत घटकांवर आधारीत आहे - प्रोपोर्शन, आर्किटेक्चर, स्टाईलिंग आणि टेक्नॅालॅाजी. नव्या गाडीमध्ये स्टाईलिश रीअर प्रोफाइलसह झेड-आकाराचे टेल लाइट डिझाइन आहे. कंपनीने फ्लोटिंग-प्रकारातील इंफोटेनमेंट स्क्रीनसह आडव्या लेआउट आणि स्ट्रेच-आउट डॅशबोर्डवर जोर दिला असल्याचे दिसते. भारतात 2008 मध्ये प्रथम लाँच करण्यात आलेली, कोरियन बनावटीची ही कार ग्राहकांमध्ये आजही लोकप्रिय आहे.

नवीन कारमध्ये अनेक आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. यात १०.२५ इंचांचा स्क्रीन सोबत फुल डिजिटल इंस्ट्रूमेंट कन्सोल, अँड्रॉयड ऑटो आणि अॅपल कारप्ले सोबत १०.२५ इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऐम्बिऐंट लाइटिंग, वायरलेस स्मार्टफोन चार्जर, की-लेस एंट्री, पुश बटन स्मार्ट आणि प्रीमियम ऑडियो सिस्टम यासारख्या फीचर्सचा समावेश आहे. तसेच या कारमध्ये व्हेंटिलेटेड सिट्स, ६ एअरबॅग्स, रिव्हर्स कॅमेरा आणि ऑडियो कंट्रोल यासारखी वैशिष्ट्ये असणार आहेत.
 

संबंधित बातम्या