Social Media Influencers : इन्फ्ल्यून्सर्स साठी नवीन नियम; जाणून घ्या अन्यथा भरावा लागेल 50 लाखांपर्यंतचा दंड

केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण (CCPA) ने इन्फ्ल्यून्सर (Influencers) साठी नवीन नियम लागू केले आहेत.
New Rule for Influencers
New Rule for InfluencersDainik Gomantak

केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण (CCPA) ने इन्फ्ल्यून्सर (Influencers) साठी नवीन नियम लागू केले आहेत. या नियमाचे उल्लंघन केल्यास 50 हजार रुपयांपर्यंतची रक्कम भरावी लागू शकते. तसेच, कोणत्याही ब्रँडची जाहिरात करणे 6 महिन्यांसाठी थांबवले जाऊ शकते. शुक्रवारीच हा नवा नियम लागू करण्यात आला. (New Rule for Influencers)

New Rule for Influencers
Goa Petrol-Diesel Price : गोव्यातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किरकोळ घट, जाणून घ्या आजचे दर

सीसीपीए प्रमुख निधी खरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, जेव्हा जाहिरातदार आणि सेलिब्रिटी किंवा इन्फ्ल्यून्सर यांच्यात डील असते तेव्हा त्या डीलचा खुलासा करणे आवश्यक असते. हा नियम ग्राहकांना सुरक्षितता आणि पारदर्शकता आणण्यासाठी CCPA ने आणला आहे. 2025 पर्यंत जाहिरात बाजार 2,800 कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे.

हे नियम लागू होतील

CCPA ने आपल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये म्हटले आहे की, हे नियम त्या सर्व व्यक्तींना लागू होतील जे लोक त्यांच्या कामातून किंवा जाहिरातीद्वारे प्रभावित करतात. सर्व तपशील स्पष्टपणे नमूद करणे बंधनकारक आहे. त्याच वेळी, व्हिडिओच्या बाबतीत आपण कोणतीही माहिती लपवू शकत नाही. वर्णनाव्यतिरिक्त, व्हिडिओंमध्ये संपूर्ण ब्रँड माहिती देखील असावी.

कायदेशीर कारवाईही होऊ शकते

ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंग म्हणाले की नवीन मार्गदर्शक तत्त्वे वैयक्तिक काळजी आणि कपड्यांच्या विभागांवर सर्वात जास्त परिणाम करतील कारण ते उत्पादनांच्या जाहिरातीसाठी सोशल मीडिया इन्फ्ल्यून्सरची निवड करणाऱ्या सर्वात मोठ्या श्रेणी आहेत. रोहित कुमार सिंग यांनी सांगितले की, नियमांचे पालन न केल्यास, नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी ग्राहकांना अधिकार्‍यांकडे जाण्याची कायद्यांतर्गत तरतूद आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com