चिंताजनक! कोरोनाच्या संकटामुळे सरकारी तिजोरीवरील भार वाढणार 

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 1 फेब्रुवारी 2021

आगामी आर्थिक वर्ष 2021-22 साठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत अर्थसंकल्प जाहीर केला. यावेळेस वित्तीय वर्ष 2021 मधील वित्तीय तूट राष्टीय सकल उत्पन्नाच्या (जीडीपी) 9.5 टक्के राहणार असल्याची माहिती निर्मला सीतारमण यांनी दिली.

आगामी आर्थिक वर्ष 2021-22 साठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत अर्थसंकल्प जाहीर केला. यावेळेस वित्तीय वर्ष 2021 मधील वित्तीय तूट राष्टीय सकल उत्पन्नाच्या (जीडीपी) 9.5 टक्के राहणार असल्याची माहिती निर्मला सीतारमण यांनी दिली. तर आर्थिक वर्ष 2022 मध्ये ही तूट 6.8 टक्क्यांवर आणण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवल्याचे  निर्मला सीतारमण यांनी म्हटले आहे. 

Union Budget 2021 : यंदाच्या अर्थसंकल्पाबद्दल जाणून घ्या

जीडीपी वरील वित्तीय तूट आर्थिक वर्ष 2026 पर्यंत 4.5 टक्क्यांपर्यंत कमी होणार असल्याची माहिती निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकलप सादर करताना सांगितली. तसेच एकूण खर्च 34.5 लाख कोटी रुपये असल्याचे निर्मला सीतारमण म्हणाल्या. तर वित्तीय वर्ष 2021 साठी भांडवली खर्च 4.39 लाख कोटी रुपये राहण्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यानंतर 2021 च्या आर्थिक वर्षात वित्तीय तूट भरून काढण्यासाठी सरकार 80,000 कोटी रुपयांचे अतिरिक्त भांडवल खुल्या बाजारातून उभे करणार असल्याचे निर्मला सीतारमण यांनी अधोरेखित केले. 

याव्यतिरिक्त, वित्तीय वर्ष 2022 मध्ये एकूण खर्च 34.83 लाख कोटी आणि भांडवली खर्च 5.54 लाख कोटी रुपये राहणार असल्याची माहिती निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करताना दिली. आणि 2022 पर्यंत बाजारातून घेतलेले कर्ज 12 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहचण्याची अपेक्षा असल्याचे निर्मला सीतारमण यांनी सांगितले. कोरोनाच्या संकटामुळे जगभरातील सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थांना मोठा धक्का सहन करावा लागला आहे.  

संबंधित बातम्या