भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे व्याजदर जैसे थे; महागाई दर घसरला

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021

भारतीय रिझर्व्ह बॅंकेने चलनविषयक धोरण समितीच्या (आरबीआय एमपीसी) बैठकीत व्याज दरात बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. 

नवी दिल्ली. भारतीय रिझर्व्ह बॅंकेने चलनविषयक धोरण समितीच्या (आरबीआय एमपीसी) बैठकीत व्याज दरात बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की समितीने व्याजदर जसेच्या तसे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या रेपो दर 4 टक्के आणि रिव्हर्स रेपो दर 3.35 टक्के आहे.

अर्थशास्त्रज्ञांच्या अपेक्षेनुसार चलनविषयक धोरणाबाबत आरबीआयने नरमाईची भूमिका घेतली आहे. आज दुपारी 12 वाजता रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांची  पत्रकार परिषद देखील आहे. अर्थव्यवस्थेतील रिकव्हरीची चिन्हे अधिक मजबूत झाली आहेत. कोरोनामुळे फटका बसलेल्या क्षेत्रांमध्येदेखील सुधारणा होत आहे. कोरोना लसीच्या उत्पादनात वाढ झाल्यानंतर आर्थिक विकासातदेखील वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असल्याचे शक्तिकांत दास यांनी सांगितले. 

BSNL ने आणली सिनेमा प्लसची नविन ऑफर; मोजावे लागणार फक्त 129 रुपये  

आर्थिक विकासास समर्थन देणे आवश्यक आहे

आरबीआयने आर्थिक वर्ष 2022 च्या पहिल्या सहामाहीत किरकोळ चलनवाढीच्या अंदाजामध्ये 5-5.2 टक्क्यांपर्यंत सुधारणा केली आहे. पूर्वी हा अंदाज 4.6-5.2 टक्के होता. रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर म्हणाले, महागाई 6 टक्क्यांच्या पातळीवर आली आहे. 

2022 मध्ये आर्थिक वाढीचा दर 10.5 टक्के राहण्याचा अंदाज

2022 मध्ये आर्थिक वाढीचा दर 10.5 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत किरकोळ चलनवाढीचा दर 5.8 टक्क्यांवरून 5.2 टक्क्यांपर्यंत सुधारित करण्यात आला आहे. दास म्हणाले, दुसऱ्या तिमाहीत उत्पादन क्षेत्राच्या संपूर्ण क्षमतेच्या वापरामध्ये 63.3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अलिकडच्या काही महिन्यांत एफडीआय आणि विदेशी संस्थात्मक गुंतवणूकीतही वाढ झाली आहे.

Union Budget 2021: जास्त पगार असणाऱ्या नौकरदारांना झटका

सध्याचा रेपो दर आता 4 टक्के 

सध्या रिझर्व्ह बँकेचा रेपो दर 4 टक्के आहे, जो ऐतिहासिकदृष्ट्या कमी आहे. यापूर्वी 22 मे 2020 रोजी हा दर बदलला होता. कोरोना विषाणूमुळे एमपीसीच्या बैठकीशिवाय हा बदल करण्यात आला. 2020 फेब्रुवारीपासून आरबीआयने रेपो दरात एकूण 1.15 टक्के कपात केली आहे. प्रधान अर्थशास्त्रज्ञ आणि इंडिया रेटिंग्स एण्ड रिसर्चचे संचालक सुनील कुमार सिन्हा म्हणाले की, आर्थिक वाढ अधिक महत्त्वाची आहे. त्यामुळे रेपो दर वाढविण्याची शक्यता नाही.

महागाईचा दर खाली घसरला आहे

डिसेंबर 2020 च्या सरकारी आकडेवारीनुसार किरकोळ महागाई दर 4.59 टक्क्यांवर आला आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये किरकोळ चलनवाढीचा दर 6.93 टक्के होता. किरकोळ महागाई दराच्या आधारे आरबीआय आपला मुख्य व्याज दर ठरवते. महागाई कमी झाली असल्याने व्याजदरामध्ये बदल होण्याची अपेक्षा कमी होती. सध्या रिझर्व्ह बँकेने 5 ऑगस्ट 2016 ते 31 मार्च 2021 पर्यंत किरकोळ चलनवाढ सरासरी 4 टक्क्यांपर्यंत (2 टक्के चढ-उतारांच्या व्याप्तीपर्यंत) मर्यादित करण्याचे धोरण अवलंबिले आहे.

संबंधित बातम्या