‘न्युजप्रिंट’वर सीमा शुल्क नको’

‘न्युजप्रिंट’वर सीमा शुल्क नको’
News Print

चेन्नई

वर्तमानपत्रे आणि मासिके यांच्या छपाईसाठी वापरल्या जाणाऱ्या कागदावरील सीमाशुल्क पूर्णपणे माफ केले जावे. सरकारी जाहिरातीची थकबाकी सरकारने ताबडतोब द्यावी,जाहिरातींचे दर शंभर टक्क्यांनी वाढवावेत अशा मागण्या द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभर लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे देशातील वृत्तपत्रसृष्टीचे जबर आर्थिक नुकसान झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. स्टॅलिन यांनी याच आठवड्यामध्ये दक्षिणेतील वर्तमानपत्र प्रकाशकांशी चर्चा केली होती, त्यानंतर त्यांनी या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना विविध मागण्या करणारे पत्र लिहिले आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com