Ola इलेक्ट्रिक कार बघून थक्क व्हाल, जाणून घ्या फिचर्स आणि बरच काही

इलेक्ट्रिक स्कूटर निर्माता कंपनी ओला यंदाच्या स्वातंत्र्यदिनी आपली पहिली इलेक्ट्रिक कार आणणार असल्याची माहिती समोर येत आहे.
Ola New Electric Car
Ola New Electric CarDainik Gomantak

इलेक्ट्रिक स्कूटर निर्माता कंपनी ओला यंदाच्या स्वातंत्र्यदिनी आपली पहिली इलेक्ट्रिक कार आणणार असल्याची माहिती समोर येत आहे. ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. अग्रवाल यांनी ट्विट केले की, त्यांची कंपनी देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नवीन उत्पादनाची घोषणा करणार आहे तसेच या स्वातंत्र्यदिनी कंपनी आपली पहिली इलेक्ट्रिक कार बाजारामध्ये आणू शकते. (Ola to launch electric car on August 15 You will be amazed by the design)

Ola New Electric Car
युवीने खरेदी केली नवीन BMW X7 SUV, जाणून घ्या कारची किंमत अन् फीचर्स

ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी ट्विट केले

भाविश अग्रवाल यांनी त्यांच्या ट्विटमध्ये जास्त काही सांगितले नाही, परंतु ओलाने आधीच इलेक्ट्रिक कारमध्ये स्वारस्य दाखवले आहे. सीईओ अग्रवाल यांनीही काही महिन्यांपूर्वी याबाबत ट्विट देखील केले होते. CEO ने 15 ऑगस्टच्या घोषणेबाबत एक पोल देखील सुरू केला, ज्यामध्ये नवीन S1, देशातील स्पोर्ट्स कार, Ola Sail Factory, S1 नवीन आकर्षक रंग कमी किमतीत असे पर्याय देखील त्यामध्ये आहेत.

जूनमध्ये दिसली कारची पहिली झलक

यावर्षीच जूनमध्ये ओलाने आपल्या पहिल्या कारची झलक दाखवली होती. 19 जून रोजी, ओला फ्यूचर फॅक्टरी येथे साजरा करण्यात आलेल्या ओलाच्या ग्राहक दिनानिमित्ताने एक व्हिडिओ जारी केला होता, ज्यामध्ये त्यांनी प्रथमच आपल्या ई-कारची झलक दाखविली होती.

यामध्ये, कारचा लूक पाहून कुणालाही याचे आकर्षण होऊ शकते. टीझर कारचे पुढील आणि मागील डिझाइनवर ओलाचा लोगो आहे. कार लांब पल्ल्याच्या बॅटरीसह सेडान देखील असू शकते. कंपनी इलेक्ट्रिक कार तयार करण्यासाठी नवीन कारखान्यांसाठी 1,000 एकर जागा शोधत आहे, जी होसूरमधील विद्यमान कारखान्यापेक्षा जवळजवळ दुप्पट असेल तसेच ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटर्स होसूर येथील ओलाच्या कारखान्यात बनवल्या जातात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com