OPS vs NPS: जुन्या पेन्शन योजनेबाबत मोठी अपडेट, नवीन पेन्शन योजनेपेक्षा...

Old Pension Scheme: आजकाल जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजनांबाबत बराच गदारोळ पाहायला मिळत आहे.
Money
MoneyDainik Gomantak

Old Pension Scheme: आजकाल जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजनांबाबत बराच गदारोळ पाहायला मिळत आहे. पेन्शनसाठी पात्र असलेले लोक जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजना यावर अधिक चर्चा करत आहेत. तथापि, दोन्ही पेन्शन योजनांबद्दल जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजनांचे अपडेट देणार आहोत. या पेन्शन योजना एकमेकांपासून कशा वेगळ्या आहेत हे सांगणार आहोत.

जुनी पेन्शन योजना

जुनी पेन्शन योजना किंवा OPS ही एक सेवानिवृत्ती योजना आहे जी सरकारद्वारे मंजूर केली जाते. जुन्या पेन्शन योजनेंतर्गत, सरकारी कर्मचाऱ्यांना (Employees) त्यांच्या शेवटच्या काढलेल्या पगाराच्या आधारे पेन्शन दिली जाते. या योजनेंतर्गत, लाभार्थींना त्यांचे सेवा आयुष्य संपेपर्यंत मासिक पेन्शन दिली जाते. व्यक्तीने काढलेल्या शेवटच्या पगाराचा अर्धा भाग मासिक पेन्शन म्हणून दिला जातो.

Money
Old Pension Scheme: 'या' राज्यातील कर्मचाऱ्यांना मिळाली भेट, जुनी पेन्शन योजना लागू करणार; CM ची घोषणा

नवीन पेन्शन योजना

NPS ही आणखी एक सेवानिवृत्ती योजना आहे, ज्यामध्ये लाभार्थी निवृत्तीनंतर गुंतवलेल्या रकमेपैकी 60% काढू शकतील. ही योजना 2004 मध्ये भारत सरकारच्या माध्यमातून सुरु करण्यात आली. ज्यामध्ये उर्वरित 40% रक्कम मासिक पेन्शन मिळविण्यासाठी वार्षिकीमध्ये गुंतवणे आवश्यक आहे, म्हणजेच, निवृत्तीनंतर 60% एकरकमी रक्कम आणि मासिक पेन्शन मिळविण्यासाठी वार्षिकीमध्ये 40% गुंतवणूक (Investment) करणे आवश्यक आहे.

Money
Old Pension Scheme: जुन्या पेन्शन योजनेवर मोठी अपडेट, पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार म्हणाले...

कर सूट

दुसरीकडे, जुन्या पेन्शन योजनेत कोणत्याही प्रकारचा कर लाभ मिळत नाही. तर नवीन पेन्शन योजनेत, कर्मचारी आयकर कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत आणि 80CCD (1B) अंतर्गत इतर गुंतवणुकीवर 50,000 रुपयांपर्यंतची कर सूट मिळू शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com