Old Pension बाबत मोठी बातमी, मोदी सरकारने लागू केली जुनी पेन्शन! लाखो कर्मचाऱ्यांचे बल्ले-बल्ले

Old Pension Scheme Latest News: OPS आणि NPS बाबत अनेक दिवसांपासून देशभरात चर्चा सुरु होती, त्यानंतर आता मोदी सरकारने मोठी घोषणा केली आहे.
Prime Minister Narendra Modi
Prime Minister Narendra Modi Dainik Gomantak

Old Pension News: जुन्या पेन्शन योजनेबाबत केंद्र सरकारकडून एक मोठी अपडेट जारी करण्यात आली आहे. तुम्हालाही जुन्या पेन्शन योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आली आहे.

प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. होय, आता तुम्ही जुन्या पेन्शन योजनेचा पर्याय निवडू शकता.

OPS आणि NPS बाबत अनेक दिवसांपासून देशभरात चर्चा सुरु होती, त्यानंतर आता मोदी सरकारने मोठी घोषणा केली आहे.

कोणत्या कर्मचाऱ्यांना OPS चा लाभ मिळेल?

जुन्या पेन्शन योजनेच्या अपडेटनुसार, 22 डिसेंबर 2003 पूर्वी कर्मचारी भरती झाला असेल तर त्या सर्वांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळेल.

त्याचबरोबर, 22 डिसेंबर 2003 नंतर सरकारी नोकरीत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना (Employees) जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार नाही. अशा लोकांना नवीन पेन्शन योजनेत समाविष्ट केले जाईल.

Prime Minister Narendra Modi
Old Pension लागू करण्याबाबत मोठी अपडेट, कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सरकारने उचलले 'हे' पाऊल!

ऑगस्टपर्यंत जुनी पेन्शन योजना निवडा

जो कोणी सरकारी कर्मचारी आहे तो जुनी पेन्शन योजना निवडू शकतो. त्याला 31 ऑगस्ट 2023 पर्यंत ही पेन्शन निवडण्याचा पर्याय आहे.

यासोबतच सरकारने सांगितले आहे की, जे पात्र कर्मचारी 31 ऑगस्टपर्यंत जुन्या पेन्शन योजनेचा (OPS) पर्याय निवडणार नाहीत, त्यांना नवीन पेन्शन योजनेत टाकले जाईल.

निवडल्यानंतर बदलू शकत नाही

सरकारी माहितीनुसार, जर कोणत्याही कर्मचाऱ्याने जुन्या पेन्शन योजनेत जाण्याचा पर्याय निवडला तर तो शेवटचा पर्याय मानला जाईल. यानंतर, ते सर्व कर्मचारी नव्या पेन्शन योजनेत जाऊ शकणार नाहीत.

Prime Minister Narendra Modi
Old Pension Scheme: जुन्या पेन्शनबाबत सरकारने केला 'हा' मोठा खुलासा; ऐकून व्हाल थक्क!

जुन्या पेन्शन योजनेचे काय फायदे आहेत?

जुन्या पेन्शन योजनेच्या फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे शेवटच्या काढलेल्या पगाराच्या आधारे केले जाते.

याशिवाय, महागाईचा दर वाढल्याने डीएही वाढतो. सरकार (Government) जेव्हा नवीन वेतन आयोग लागू करते तेव्हाही पेन्शन वाढवते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com