वनप्लसकडून नवी सिरीज लाँच; 'हे' आहेत जबरदस्त फीचर्स

दैनिक गोमन्तक
बुधवार, 24 मार्च 2021

चिनची स्मार्टफोन कंपनी वनप्लसने नवी सिरीज लाँच केली आहे. वनप्लस कंपनीने लाँच केलेल्या 9  सीरीजमध्ये वनप्लस 9, वनप्लस 9 प्रो आणि वनप्लस 9 आरचा समावेश आहे.

चिनची स्मार्टफोन कंपनी वनप्लसने नवी सिरीज लाँच केली आहे. वनप्लस कंपनीने लाँच केलेल्या 9  सीरीजमध्ये वनप्लस 9, वनप्लस 9 प्रो आणि वनप्लस 9 आरचा समावेश आहे. वनप्लस कंपनीने आपल्या अधिकृत यूट्यूब आणि ट्विटर हँडलवरून मंगळवारी संध्याकाळी साडेसहा वाजता थेट प्रक्षेपण करत ही सिरीज लाँच केली. वनप्लस 9 आणि वनप्लस 9 प्रो स्मार्टफोनमध्ये युजर्सला कॅमेरा एक्सपीरियन्स देण्यासाठी कंपनीने Hasselblad सोबत करार केला आहे. 

वनप्लस सिरीजमध्ये आहेत जबरदस्त फीचर्स 
वनप्लस 9 आणि वनप्लस 9 प्रो क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसरचा वापर केला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 4500 mAh ची बॅटरी दिली आहे. यासह 128 जीबी मेमरी आणि 8 जीबी रॅम तर 256 जीबी जीबी पर्यंत स्टोरेज देण्यात आला आहे. याशिवाय 12 जीबी पर्यंत LPDDR5 रॅम दिली आहे. तर वनप्लस 9 मध्ये 6.55 इंचाचा फुल एचडी प्लस फ्लूइड एमोलेड डिस्प्ले दिला आहे. त्याचबरोबर यात 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर देखील देण्यात आला आहे. तर 50 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा सेंसर दिला आहे.  यानंतर, 2 मेगापिक्सल मोनोक्रोम कॅमेराही या मोबाईल मध्ये देण्यात आला आहे. यासोबतच कंपनीने सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. वनप्लस 9 चा 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 49,999 रुपयापासून सुरु होईल. तर  12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 54,999 रुपये पासून सुरू होईल.

वनप्लस 9 प्रो -
वनप्लस 9 प्रोमध्ये स्नॅपड्रॅगन 888 5 जीबी प्रोसेसरचा वापर केला असून 12 जीबी पर्यंत रॅम देण्यात आली आहे. तसेच 256 जीबी पर्यंत स्टोरेज दिले आहे. या फोनमध्ये बॅक पॅनेलला क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. याशिवाय 48MP प्रायमरी कॅमेरा सेंसर, सोबत 50MP सेकेंडरी कॅमेरा सेंसर दिला असून तो अल्ट्रा-वाइड फ्रीफॉर्म लेंस सोबत येतो. तर 2 मेगापिक्सलचा मोनोक्रोम कॅमेरा दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.  या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात ग्राहकांना Hasselblad Pro Mode मिळणार आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 4500 mAh ची बॅटरी दिली आहे. 65 टी वार्प चार्ज आणि वार्प चार्ज 50 वायरलेस फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. वनप्लस 9 प्रो च्या 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 64,999 रुपये असेल तर 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 69,999 रुपये असेल.

वनप्लस 9 आर - 
एंट्री-लेव्हल वनप्लस 9 आर मध्ये 6.5 इंचाचा 1080 पी 90 हर्ट्ज रिफ्रेश डिस्प्ले देण्यात आला आहे. तर फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 690 प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. तसेच, फोन व्हेरिएंटमध्ये 90 एचझेड रिफ्रेश रेटसह फुल एचडी स्क्रीन दिली जाईल. यात गेमिंग ट्रिगरचा सेखील समावेश करण्यात आला आहे. वनप्लस 9 आर कॅमेरामध्ये एफ / 1.7 लेन्स आणि 8 एमपी अल्ट्राव्हायोलेट लेन्ससह 64 एमपी प्राइमरी कॅमेरा सेन्सर आहे. विशेष म्हणजे हा फोन वनप्लस 9 सिरीज चा सर्वात स्वस्त फोन असेल. याची 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 39,999 रुपये असू शकते. तर 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 43,999 रुपये असेल.

संबंधित बातम्या