New Mobile Phones: 45 दिवसांचा बॅटरी बॅकअप; पाण्याचा धोका नाही, ढिग फिचर्स असलेला रफ & टफ मोबाईल

हँडसेटमध्ये 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह हँडसेटमध्ये मायक्रोएसडी कार्डचीही सोय आहे.
Oukitel WP21
Oukitel WP21Dainik Gomantak

Oukitel WP21 Smartphone: आजकाल प्रत्येकाला रफ & टफ स्मार्टफोन हवा आहे. अनेकवेळा हातातून खाली पडला, पाण्यात पडला तर मोबाईल खराब होऊ शकतो. त्यामुळे या दोन्ही पासून संरक्षण मिळावे असा स्मार्टफोन प्रत्येकाला हवा आहे. असाच एक हँडसेट बाजारात आला असून, जो तुम्हाला अनेक फायदे देऊ शकतो.

(Oukitel WP21 Smartphone Details, Features, Price and Launching Date)

Oukitel WP21
Aurangabad News: स्वत:ला पेटवून प्रेयसीला मारली मिठी, मराठवाडा विद्यापीठ परिसरातील धक्कादायक घटना

बाजारात Oukitel WP21 हा एक शक्तिशाली स्मार्टफोन आला आहे. या स्मार्टफोनला 9,800 mAh बॅटरी असून तुम्हाला 45 दिवसांचा बॅटरी बॅकअप मिळेल. तसेच, 120hz AMOLED पॅनेल, MediaTek Helio G99 चिपसेट आणि बरेच वैशिष्ट्ये या मोबाईलमध्ये आहेत.

Oukitel WP21 स्मार्टफोनमध्ये FHD+ रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह 6.78-इंचाचा डिस्प्ले आहे. विशेष म्हणजे, हँडसेटच्या मागील बाजूस दुसरा डिस्प्ले आहे जो AOD ला सपोर्ट करतो आणि नोटिफिकेशन, संगीत नियंत्रण तसेच, कॅमेरा व्ह्यूफाइंडर म्हणून काम करू शकतो.

Oukitel WP21
Zakir Naik In FIFA: भारताचा वादग्रस्त इस्लाम धर्मगुरू 'फिफा'मध्ये, 'या' कामासाठी विशेष आमंत्रण

फोटोग्राफीसाठी, या हँडसेटमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये 64MP Sony IMX 686 मुख्य सेन्सर, 20MP नाईट व्हिजन कॅमेरा आणि 2MP मॅक्रो युनिट आहे. Oukitel WP21 IP68 वॉटर रेझिस्टन्स आणि IP69K डस्ट रेझिस्टन्ससह येतो. हे MIL-STD-810H आहे, ज्यामुळे हा हँडसेट सर्व प्रकारच्या हवामानात वापरण्यास योग्य आहे.

या स्मार्टफोन Helio G99 चिपसेट आहे जो 6nm प्रोसेसद्वारे तयार करण्यात आला आहे. 9,800mAh बॅटरीमुळे मोबाईलला 1,150 तासांपर्यंत स्टँडबाय टाइम आणि 12 तासांपर्यंत व्हिडिओ प्लेबॅक सुविधा आहे. 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह हँडसेटमध्ये मायक्रोएसडी कार्डचीही सोय आहे.

नवीन Oukitel WP21 हँडसेट 22,922 रूपयांपर्यंत 24 नोव्हेंबरपासून AliExpress या संकेतस्थळावर खरेदीसाठी उपलब्ध होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com