Pension Hike: आमदारांची चांदी, सरकारने वाढवली पेन्शन; आता दरमहा मिळणार...

Pension Hike News: पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हीही पेन्शन वाढीची वाट पाहत असाल तर नवरात्रीमध्ये तुम्हाला सरकारकडून मोठी भेट मिळाली आहे.
Money
MoneyDainik Gomantak

Pension Hike News: पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हीही पेन्शन वाढीची वाट पाहत असाल तर नवरात्रीमध्ये तुम्हाला सरकारकडून मोठी भेट मिळाली आहे.

केंद्र सरकारबरोबरच राज्य सरकारकडूनही कर्मचाऱ्यांना अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. आता सरकारने कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

बिल जारी करुन वाढीव पेन्शनची माहिती देण्यात आली आहे. यासोबतच राज्य सरकारने प्रवास भत्त्यातही वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

पेन्शन 35,000 रुपयांवरुन 58,300 रुपये झाली

छत्तीसगड (Chhattisgarh) सरकारने विधानसभेत एक दुरुस्ती विधेयक मंजूर केले आहे, ज्यामध्ये पेन्शन आणि प्रवास भत्ता वाढवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. या विधेयकानुसार माजी आमदारांचे पेन्शन 35 हजारांवरुन 58 हजार 300 रुपये करण्यात येणार आहे.

Money
Gratuity & Pension Rule: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, सरकारने बदलले नियम; पेन्शन-ग्रॅच्युईटी संपणार!

अतिरिक्त पेन्शन मिळेल

या विधेयकानुसार, माजी आमदारांना त्यांच्या सदस्यत्वाच्या पहिल्या कार्यकाळानंतर (पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधी) प्रत्येक एक वर्षासाठी दरमहा एक हजार रुपये अतिरिक्त पेन्शन (Pension) मिळण्याचा अधिकार असेल.

भत्ता 8 लाखांवरुन 10 लाखांपर्यंत वाढवला

यासोबतच, विधेयकात अशी माहिती मिळाली आहे की, सध्या हा भत्ता रेल्वे किंवा विमान प्रवासासाठी सध्याच्या 8 लाख रुपये प्रतिवर्षी उपलब्ध आहे. त्याचबरोबर आता ती वाढवून 10 लाख करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर माजी आमदारांचा हा भत्ता वार्षिक 4 लाखांवरुन 5 लाखांपर्यंत वाढला आहे.

Money
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांचे बल्ले-बल्ले, 27312 चा होणार बंपर फायदा

तिजोरीवर अतिरिक्त बोजा पडेल

माजी आमदारांना 10,000 रुपये टेलिफोन भत्ता मिळेल आणि ऑर्डरली भत्ता 15,000 रुपये असेल. राज्याने घेतलेल्या या निर्णयानंतर सरकारला 16.96 कोटी रुपये अतिरिक्त खर्च करावे लागणार आहेत.

विधानसभेचे सदस्य किती

गेल्या वर्षी जुलैमध्ये विधानसभेने मुख्यमंत्री, सभापती, मंत्री आणि आमदारांच्या पगारात वाढ करण्याचे विधेयक मंजूर करुन राज्याच्या तिजोरीवर वार्षिक 6.81 कोटी रुपयांचा बोजा टाकला होता. छत्तीसगड विधानसभेत 90 सदस्य आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com