Pension News: पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! Life Certificate सादर करण्याचे बदलले नियम

Pension News: पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
Pensioners
PensionersDainik Gomantak

Pension News: पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता पेन्शनधारक घरबसल्या व्हिडिओ कॉलद्वारे लाइफ सर्टिफिकेट सादर करु शकतात. वास्तविक, SBI आणि बँक ऑफ बडोदाने त्यांच्या ग्राहकांना साध्या व्हिडिओ कॉलद्वारे त्यांचे लाइफ सर्टिफिकेट सादर करण्याची सुविधा दिली आहे. म्हणजेच, आता पेन्शनधारकांना घरबसल्या व्हिडिओ कॉलद्वारे त्यांचे लाइफ सर्टिफिकेट सहज सादर करता येणार आहे. SBI आणि BoB ने ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

बँकेने माहिती दिली

लाइफ सर्टिफिकेट नोव्हेंबरमध्ये सादर केले जाते. तुम्ही ते महिनाभर केव्हाही सबमिट करु शकता. जर पेन्शनधारक असे करु शकला नाही तर त्याचे पेन्शन बंद केले जाऊ शकते. आता ते डिजिटल स्वरुपात देखील जमा केले जाऊ शकते. एसबीआय आणि बँक ऑफ बडोदाने (Bank of Baroda) ट्विट करुन माहिती दिली की, तुम्ही तुमचे वार्षिक लाइफ सर्टिफिकेट सादर करण्यासाठी व्हिडिओ कॉलची मदत घेऊ शकता. या सुविधेद्वारे तुम्ही घरबसल्या व्हिडिओ कॉलद्वारे लाइफ सर्टिफिकेट सादर करु शकता.

Pensioners
EPFO च्या ग्राहकांची वाढणार पेन्शन! Pension वाढीच्या प्रस्तावावर सरकारचे मोठे वक्तव्य

अशा प्रकारे BOB ग्राहक लाइफ सर्टिफिकेट सादर करतात

1. यासाठी सर्वप्रथम बँकेच्या अधिकृत वेबसाइट Bankofbaroda.com वर क्लिक करा.

2. आता PPO क्रमांक आणि खाते क्रमांक प्रविष्ट करा ज्यावरुन तुमची पेन्शन येते.

3. आता आधार सोबत तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आलेला वन-टाइम पासवर्ड (OTP) एंटर करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.

4. यानंतर इथे दिलेल्या पर्यायांपैकी कोणताही एक पर्याय निवडा.

5. यानंतर Call Now or Later पर्याय निवडा.

6. आता तुम्हाला बँकेकडून व्हिडिओ कॉल केला जाईल आणि त्यानंतर BOB एजंट तुमच्या समोर येईल.

7. यानंतर तुम्हाला तुमचा फोटो आयडी आणि इतर तपशील भरावा लागेल.

8. आधारच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ओटीपी पुन्हा येईल, जो पुन्हा प्रविष्ट करणे आवश्यक आहे.

9. यानंतर तुम्ही तुमचे लाइफ सर्टिफिकेट सादर करा.

Pensioners
EPS Pension Scheme: EPS पेन्शन योजनेत मोठा दिलासा, कर्मचाऱ्यांना वेळेपूर्वी काढता येणार पैसे

एसबीआयचे ग्राहक असे सर्टिफिकेट सादर करतात

1. पेन्शनधारक 'SBI pensions seva' या वेबसाइटवर जातात. त्यानंतर शीर्षस्थानी असलेल्या 'VidioLc' लिंकवर क्लिक करतात.

2. आता तुम्ही पेन्शन मिळालेला खाते क्रमांक सबमिट करा, नंतर कॅप्चा प्रविष्ट करा आणि तुमचा आधार डेटा वापरण्यासाठी चेकबॉक्सवर टिक करा.

3. त्यानंतर आधार कार्डशी लिंक केलेल्या मोबाइल नंबरवर एक OTP येईल.

4. त्यानंतर तुमची आवश्यक प्रमाणपत्रे सबमिट करा आणि नेक्स्ट वर क्लिक करा. आता नवीन पेजवर तुमच्या सोयीनुसार व्हिडिओ कॉलसाठी अपॉइंटमेंट शेड्यूल करा.

5. त्यानंतर तुम्हाला Confirmation SMS आणि ईमेलद्वारे पाठवले जाईल.

6. Confirmation नंतर वेळापत्रकानुसार व्हिडिओ कॉलमध्ये सामील व्हा. तुम्हाला व्हेरिफिकेशन कोड वाचावा लागेल आणि बँक अधिकाऱ्यासोबत कॉलमध्ये तुमचे पॅन कार्ड देखील दाखवावे लागेल.

7. पडताळणी केल्यानंतर, कॅमेराला होल्ड करा जेणेकरुन बँक अधिकारी तुमचा चेहरा स्पष्टपणे कॅप्चर करु शकतील.

8. सत्राच्या शेवटी तुमची माहिती रेकॉर्ड केली गेली आहे, याची पुष्टी करणारा एक संदेश दिसेल.

9. यानंतर पेन्शनधारकांना 'व्हिडिओ लाइफ सर्टिफिकेट सर्व्हिस'ची माहिती एसएमएसद्वारे दिली जाईल.

Pensioners
LIC Saral Pension Yojana: सरकारची सुपरहिट स्कीम! आयुष्यभरासाठी मिळणार 50,000 रुपये पेन्शन

तुम्ही डोअर स्टेप सेवेद्वारेही पैसे जमा करु शकता

पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागानुसार, पेन्शनधारक 12 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या डोअरस्टेप बँकिंग अलायन्स किंवा पोस्ट विभागाच्या डोअरस्टेप सर्व्हिसचा वापर करुन डिजिटल लाइफ सर्टिफिकेट सादर करु शकतात. यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), पंजाब नॅशनल बँक (PNB), बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, भारतीय बँकांसह 12 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये गठबंधन आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com