मुंबईत पेट्रेल-डिझेलच्या किंमती वधारल्या

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 13 जानेवारी 2021

आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलांच्या किंमतीत वाढ झाल्याने  पुन्हा एकदा पेट्रोल आणि डीझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे.

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलांच्या किंमतीत वाढ झाल्याने  पुन्हा एकदा पेट्रोल आणि डीझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर होते.

या दरांमध्ये राज्य सरकारकडून आकारला जाणारा करही समाविष्ट असतो. सरकारी तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेल्या दरात वाढ करण्यात आली आहे. ज्यामुळे डिझेल आणि पेट्रोलच्या दरांतही 20 पैशांनी वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलचे दर 91 रुपयांच्या वर गेले असून डीझेलची किंमत 81.34 रुपये प्रति लीटर झाली आहे.

देशातील मुख्य शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर (प्रतिलीटरमागे)

दिल्ली - डिझेल 74.63 रुपये, पेट्रोल 84.45 रुपये

मुंबई - डिझेल 81.34 रुपये, पेट्रोल 91.07 रुपये

चेन्नई- डिझेल 79.95 रुपये, पेट्रोल 87.18 रुपये

कोलकाता - डिझेल 78.22 रुपये, पेट्रोल 85.92 रुपये

 

 

 

 

 

संबंधित बातम्या