Goa Petrol-Diesel Price: नो चेन्ज! गोव्यातील पेट्रोल- डिझेलचे दर जैसे थे, जाणून आजचे भाव

गेल्या 24 तासांत ब्रेंट क्रूडच्या किमतीत सुमारे 3 डॉलरची घसरण झाली आहे.
Petrol-Diesel Price In Goa
Petrol-Diesel Price In GoaDainik Gomantak

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली असून गेल्या 24 तासांत ब्रेंट क्रूडच्या किमतीत सुमारे 3 डॉलरची घसरण झाली आहे. त्याचा परिणाम बुधवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींवर दिसून आला आणि आज अनेक शहरांमध्ये तेल स्वस्त झाले आहे. मात्र, दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चारही महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर बदललेले नाहीत.

राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये आज पेट्रोलची किंमत 83 पैशांनी स्वस्त झाली आहे आणि 108.481 रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहे, तर डिझेल 75 पैशांनी स्वस्त होऊन 93.72 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. हरियाणाची राजधानी गुरुग्राममध्ये आज पेट्रोल 5 पैशांनी घसरून 96.89 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 6 पैशांनी घसरून 89.76 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.

Petrol-Diesel Price In Goa
Mutual Fund SIP: एसआयपीमध्ये गुंतवणूक करताय? मग लक्षात ठेवा 'या' गोष्टी...

गोव्यातील आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

Goa Petrol Price

  • North Goa ₹ 97.84

  • Panjim ₹ 97.84

  • South Goa ₹ 97.75

Goa Diesel Price

  • North Goa ₹ 90.39

  • Panjim ₹ 90.39

  • South Goa ₹ 90.29

Petrol-Diesel Price In Goa
Income Tax: मोदी सरकारने करुनच दाखवले! टॅक्समध्ये दिली तब्बल 50,000 रुपयांची सूट

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com