दोन दिवसांच्या ब्रेकनंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत आज पुन्हा वाढ

बुधवारी आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या (Crude oil) बाजारात घसरण झाली तेव्हा ही वाढ करण्यात आली आहे. काल, आंतरराष्ट्रीय तेलाचे मानक ब्रेंट क्रूड 0.54 टक्क्यांनी घसरून 82.97 डॉलर प्रति बॅरलवर आले आहे.
दोन दिवसांच्या ब्रेकनंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत आज पुन्हा वाढ
गुरुवार,पुन्हा एकदा पेट्रोल (Petrol)-डिझेलच्या (Diesel) किंमतीत (Fuel prices) प्रचंड वाढ केली आहे. Dinik Gomantak

देशात पेट्रोल (Petrol) आणि डिझेलमध्ये (Diesel) दर गेले दोन दिवस स्थिर राहिल्यानंतर, तेल विपणन कंपन्यांनी (Oil Marketing Company) गुरुवार, 14 ऑक्टोबर 2021 रोजी पुन्हा एकदा दोन्ही इंधनांच्या किंमतीत (Fuel prices) प्रचंड वाढ केली आहे. आज राजधानी दिल्लीत (Delhi) पेट्रोल आणि डिझेल दोन्ही 35 पैसे प्रति लीटर महाग झाले आहेत. दिल्लीत पेट्रोलचा आजचा दर 104.79 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 93.54 रुपये प्रति लीटर दराने विकले जात आहे. त्याचबरोबर मुंबईत (Mumbai) पेट्रोल 36 पैशांनी महाग झाले आहे. येथे आजचा दर 110.75 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. डिझेल 37 पैशांनी वाढले असून त्याचा दर 101.40 रुपये प्रति लिटर आहे.

गुरुवार,पुन्हा एकदा पेट्रोल (Petrol)-डिझेलच्या (Diesel) किंमतीत (Fuel prices) प्रचंड वाढ केली आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किमती जाहीर, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

बुधवारी आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या बाजारात घसरण झाली तेव्हा ही वाढ करण्यात आली आहे. काल, आंतरराष्ट्रीय तेलाचे मानक ब्रेंट क्रूड 0.54 टक्क्यांनी घसरून 82.97 डॉलर प्रति बॅरलवर आले आहे. यापूर्वी, क्रूड 83 डॉलर प्रति बॅरलच्या दरापेक्षा जास्त होते. परंतु देशांतर्गत बाजारात तेलाचे दर दोन दिवस स्थिर होते. भारत हा कच्च्या तेलाचा निव्वळ आयातदार असल्याने त्याच्या देशांतर्गत किंमती थेट क्रूड चढउतारांमुळे प्रभावित होतात.

गुरुवार,पुन्हा एकदा पेट्रोल (Petrol)-डिझेलच्या (Diesel) किंमतीत (Fuel prices) प्रचंड वाढ केली आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग चौथ्या दिवशी वाढ

देशातील प्रमुख शहरात काय आहेत आजचे दर?

दिल्ली: पेट्रोल - 104.79 प्रति लिटर; डिझेल - 93.54 प्रति लिटर

मुंबई: पेट्रोल - 110.75 प्रति लिटर; डिझेल - 101.40 प्रति लिटर

कोलकाता: पेट्रोल - 105.43 प्रति लिटर; डिझेल - 96.63 प्रति लिटर

चेन्नई: पेट्रोल - 102.10 रुपये प्रति लीटर; डिझेल - 97.93 प्रति लिटर

बेंगळुरू: पेट्रोल - 108.44 प्रति लिटर; डिझेल - 99.26 प्रति लिटर

भोपाळ: पेट्रोल - 117.52 प्रति लिटर; डिझेल - 113.37 प्रति लिटर

लखनौ: पेट्रोल - 101.81 रुपये प्रति लीटर, डिझेल - 93.96 रुपये प्रति लीटर

पाटणा: पेट्रोल - 108.04 प्रति लिटर; डिझेल - 100.07 प्रति लिटर

चंदीगड: पेट्रोल - 100.86 प्रति लिटर; डिझेल - 93.34 रुपये प्रति लीटर

Related Stories

No stories found.