पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती काही केल्या कमी होत नाहीत

गोमंतक ऑनलाईन टीम
बुधवार, 9 डिसेंबर 2020

गेल्या तीन आठवड्यात पेट्रोलच्या किंमतीत जवळपास 4 टक्क्यांनी वाढ झाली आहे तर डिझेलच्या किंमतीतही 5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

नवी दिल्ली- तेलाच्या किंमतींमध्ये होणाऱ्या चढउतारांचे सत्र गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांमध्ये तेलाच्या किंमतींमध्ये लक्षणीय वाढ झाली होती. गेल्या तीन आठवड्यात पेट्रोलच्या किंमतीत जवळपास 4 टक्क्यांनी वाढ झाली आहे तर डिझेलच्या किंमतीतही 5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

कोरोनाची परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचे चित्र आहे. कोरोनावर बाजारात लसही आली असून याचा अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. परिणामस्वरूप कच्च्या मालाच्या किंमतीत आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेली वाढ आहे. 

रोज नियमीत सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जाहीर होत असतात. मागील काही दिवसांपासून देशात तेलाच्या किंमतीत वाढही झाली नाही आणि घटही झाली नाही. मात्र, 20 नोव्हेंबरपासून तेलाच्या किमतींमध्ये चढ-उतार झाल्याचे दिसून येते.     

 मागील महिन्यापासून आतापर्यंत दिल्लीत पेट्रोलचे दर 2.65 रुपयांनी तर डिझेलचे दर 3.41 रूपयांनी वाढले आहेत. याच काळात मुंबईत पेट्रोलचे दर 90.34 रूपये तर डिझेलचे दर 80.51 प्रतिलिटर इतके होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढलेल्या तेलाच्या किंमतींमुळे घरगुती बाजारातही या किंमतींमध्ये वाढ झाली आहे.

संबंधित बातम्या