नवीन वर्ष सुरू झाल्यापासून पेट्रोल तब्बल 7 रूपयांनी महागलं

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 24 फेब्रुवारी 2021

नव्या वर्षातल्या या 54 दिवसांमध्येच दिल्लीत एक लिटर पेट्रोल 7.22 रुपयांनी तर डिझेल 7.45 रुपयांनी महाग झालं आहे. दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता येथे पेट्रोलचे दर पाहिल्यास ते 90 रुपयांच्या वर पोहोचले आहे.

नवी दिल्ली : नवीन वर्ष 2021 सुरू झाल्यापासून सरकारी तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये सातत्याने वाढ करण्यात आली आहे. सतत वाढ झाल्यानंतर इंधनाचे दर देशातील बहुतेक सर्व शहरांमध्ये सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहेत. नव्या वर्षातल्या या 54 दिवसांमध्येच दिल्लीत एक लिटर पेट्रोल 7.22 रुपयांनी तर डिझेल 7.45 रुपयांनी महाग झालं आहे. दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता येथे पेट्रोलचे दर पाहिल्यास ते 90 रुपयांच्या वर पोहोचले आहे. त्याचबरोबर बर्‍याच शहरांमध्ये पेट्रोल 100 रुपयांच्या लीटरच्या जवळपास आले आहे.

Share Market : सलग पाच सत्रव्यवहारानंतर भांडवली बाजाराने नोंदवली काहीशी तेजी  

नवीन वर्षापासून पेट्रोल सरासरी 7 रूपयांनी महाग झालं आहे, राजधानी दिल्लीत नवीन वर्षाच्या सुरूवातीला  पेट्रोलची किंमत 83.71Rs होती. त्याचवेळी डिझेलची किंमत 73.87Rs होती. पण आज दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 90.93Rs आहे तर डिझेलची किंमत 81.32Rs आहे. म्हणजेच या 54 दिवसात दिल्लीत एक लिटर पेट्रोल 7.22 रुपयांनी तर डिझेल 7.45 रुपयांनी महाग झाले आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजची मोठी घोषणा ऑईल-टु-केमिकल्स या नव्या कंपनीचे अनावरण

आपल्या शहरातील पेट्रेल-डिझेलच्या किंमती जाणून घ्या

  • दिल्लीत पेट्रोल 90.93Rs आणि डिझेल 81.32Rs प्रतीलिटरआहे.
  • मुंबईत पेट्रोल 97.34Rs आणि डिझेल 88.44Rs प्रतीलिटरआहे.
  • कोलकातामध्ये पेट्रोल 91.12Rs आणि डिझेल 84.20Rs प्रतीलिटरआहे.
  • चेन्नईत पेट्रोल 92.90Rs आणि डिझेल 86.31Rs प्रतीलिटरआहे.
  • नोएडात पेट्रोल 89.19Rs आणि डिझेल 81.76Rs प्रतीलिटरआहे.
  • बंगळुरुमध्ये पेट्रोल 93.98Rs आणि डिझेल 86.21Rs प्रतीलिटरआहे.
  • भोपालमध्ये पेट्रोल 98.96Rs आणि डिझेल 89.60Rs प्रतीलिटरआहे.
  • चंडीगढ़मध्ये पेट्रोल 87.50Rs आणि डिझेल 81.02Rs प्रतीलिटरआहे.
  • पटन्यात पेट्रोल 93.25Rs आणि डिझेल 86.57Rsप्रती लिटरआहे.
  • लखनऊत पेट्रोल 89.13Rs आणि डिझेल 81.70Rs प्रतीलिटरआहे.

संबंधित बातम्या