महिलांसाठी मोदी सरकार देतेय 'ही' सुविधा, पीआयबीने सांगितली संपूर्ण हकीकत

PIB Fact Check News: केंद्र सरकारकडून अनेक सरकारी योजना राबवल्या जात असून, त्याचा लाभ देशातील गरीब, शेतकरी आणि गरजू लोकांना मिळत आहे.
Free Sewing Machine Scheme
Free Sewing Machine SchemeDainik Gomantak

PIB Fact Check News: केंद्र सरकारकडून अनेक सरकारी योजना राबवल्या जात असून, त्याचा लाभ देशातील गरीब, शेतकरी आणि गरजू लोकांना मिळत आहे.

यासोबतच मोदी सरकारने महिला आणि मुलींसाठी अनेक विशेष योजना सुरु केल्या आहेत, ज्यामध्ये आर्थिक मदत आणि जीवनावश्यक वस्तू पुरवल्या जात आहेत.

सध्या सोशल मीडियावर मोदी सरकार मोफत शिलाई मशीन देत असल्याची बातमी व्हायरल होत आहे. मात्र, प्रत्यक्षात सरकार महिलांना ही सुविधा देत आहे की नाही याबद्दल जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

असा दावा पोस्टमध्ये करण्यात येत आहे

देशातील महिलांचे (Women) सक्षमीकरण आणि त्यांना रोजगार देण्यासाठी सरकारकडून मोफत शिलाई मशीन देण्यात येत असल्याचा दावा एका पोस्टमध्ये करण्यात येत आहे. ही पोस्ट पाहिल्यानंतर पीआयबीने तथ्याची तपासणी केली. त्यात काय सत्य आहे ते जाणून घेऊया...

Free Sewing Machine Scheme
PIB Fact Check: 500 रुपयांची नोट अन् आधार कार्ड बंद होणार? पीआयबीने सांगितले संपूर्ण सत्य...

पीआयबीने वस्तुस्थिती तपासली-

>> केंद्र सरकार अशी कोणतीही योजना राबवत नाही.

>>हा फसवणूक करण्याचा प्रयत्न आहे, कृपया काळजी घ्या.

ही बातमी कोणाशीही शेअर करु नका

सध्या देशभरात सोशल मीडियावर (Social Media) अनेक खोट्या आणि व्हायरल बातम्या पाहायला मिळत आहेत. हे पाहता सरकारने असे मेसेज कुणालाही शेअर करु नयेत असे म्हटले आहे.

यासोबतच तुम्हाला सरकारशी संबंधित कोणत्याही योजनेची माहिती मिळवायची असेल तर तुम्ही केवळ अधिकृत वेबसाइटवर संपर्क साधावा.

Free Sewing Machine Scheme
PIB Fact Check: देशातील करोडो तरुणांना मोदी सरकार देणार मोफत लॅपटॉप, सरकारने दिली 'ही' मोठी अपडेट!

कोणीही तथ्य तपासू शकतो

अशा फेक न्यूजपासून दूर राहा आणि या बातम्या कोणाशीही शेअर करु नका, असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे. सध्या तरी अशा बातम्या फॉरवर्ड करु नका.

तुम्हालाही कोणत्याही व्हायरल मेसेजचे सत्य जाणून घ्यायचे असेल, तर तुम्ही या मोबाईल क्रमांक 918799711259 किंवा socialmedia@pib.gov.in वर मेल करु शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com