जन धन खात्यात पैसे नसतानाही तुम्ही काढू शकता 5 हजार रूपये

दैनिक गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑक्टोबर 2020

जन धन खात्यावरील या सुविधेचा ज्यांना लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी लाभार्थ्यांना त्यांचा आधार क्रमांक बँक खात्याला जोडावा लागणार आहे. आधार क्रमांक  न जोडल्यास या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही. तसेच मागील 6 महिन्यांपासून जन धनच्या खात्यातून ट्रांजेक्शन केली असावीत.

नवी दिल्ली- सामान्य नागरिकांना बँकिंग क्षेत्राशी जोडण्यासाठी केंद्र सरकारने 'प्रधानमंत्री जन धन योजना' सुरु केली होती. याअतंर्गत भारतातील लाखो नागरिकांनी बँकेत जन धन अकाउंट काढले होते. या योजनेअंतर्गत सरकारी अनुदाने, पेन्शन आणि इतर डायरेक्ट बेनिफिट ट्रांसफर लाभार्थ्यांच्या खात्यात येतात.

प्रधानमंत्री जन धन योजना याअंतर्गत झिरो बॅलन्स खाते उघडले जाते. लाभार्थी त्यांची बचत या खात्यावर जमा करू शकतात. कोरोनाकाळात अर्थव्यवस्था नाजूक स्थितीत असताना हे खाते लाभार्थ्यांना खूप फायदेशीर ठरले आहे. कारण या खात्यावर एकही रूपया नसताना 5 हजार रुपयांची ओव्हरड्राफ्ट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

जन धन खात्यावरील या सुविधेचा ज्यांना लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी लाभार्थ्यांना त्यांचा आधार क्रमांक बँक खात्याला जोडावा लागणार आहे. आधार क्रमांक  न जोडल्यास या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही. तसेच मागील 6 महिन्यांपासून जन धनच्या खात्यातून ट्रांजेक्शन केली असावीत. जनधन खातेधारकांनी या दोन अटींची पूर्तता केली तरच लाभार्थी ओव्हरड्राफ्ट सुविधेसाठी पात्र ठरतील. 
या योजनेंतर्गत  जन धनचे खाते उघडल्यापासून तुमच्या व्यवहाराचा इतिहास चांगला असेल तरंच या सुविधेचा लाभ घेता येऊ शकतो. जर एखाद्याच्या जन धनच्या बँक अकाउंटवरून एक किंवा दोनवेळाच ट्रांजेक्शन झालं असेल तर त्या व्यक्तीला ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ मिळू शकणार नाही. 

संबंधित बातम्या