PM Kisan Scheme: शेतकर्‍यांसाठी मोठी अपडेट, या दिवशी होणार 12 वा हप्ता जमा

PM Kisan Scheme Update: तुम्हीही पीएम किसान योजनेच्या 12 व्या हप्त्याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
Farmer
FarmerDainik Gomantak

PM Kisan 12th Installment Update: तुम्हीही पीएम किसान योजनेच्या 12 व्या हप्त्याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशातील करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात या महिन्यात 2000 रुपये ट्रान्सफर होऊ शकतात. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी ही विशेष योजना सरकार राबवते. कोणत्या दिवशी तुमच्या खात्यात पैसे येऊ शकतात, चला तर मग जाणून घेऊया...

सप्टेंबरमध्येच पैसे येतील!

केंद्र सरकारकडून (Central Government) 12 व्या हप्त्याचे पैसे 30 सप्टेंबरपर्यंत खात्यात येऊ शकतात.

Farmer
PM Kisan Scheme : पुढील 5 दिवसात करा हे काम; अन्यथा होईल नुकसान

पीएम किसानच्या 12 व्या हप्त्याचे स्टेटस पाहा-

सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.

होम पेजवरच तुम्हाला फार्मर कॉर्नरचा पर्याय मिळेल. त्यात तुम्हाला Beneficiary Status च्या पर्यायावर जावे लागेल.

त्यानंतर एक नवीन पेज उघडेल.

त्यात शेतकऱ्याकडून (Farmers) जी काही माहिती मागवली आहे, ती भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.

आता तुमच्यासमोर Beneficiary Status चा पर्याय येईल.

यामध्ये शेतकऱ्याला हप्ता मिळाला की नाही, हेही कळणार आहे.

अशा प्रकारे तुम्ही पीएम किसान 12 व्या किसान Beneficiary Status तपासू शकता.

Farmer
PM Kisan Scheme: दहावा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला नसेल तर...

सरकार 6000 रुपये देते

शेतकऱ्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरु केली आहे. यामध्ये पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये दिले जातात, जे 2-2 हजाराच्या तीन हप्त्यांमध्ये उपलब्ध आहेत. या वेळी ई-केवायसी पूर्ण झाल्याशिवाय हप्ता दिला जाणार नाही, असे सरकारकडून यापूर्वीच सांगण्यात आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com