PM Kisan: शेतकऱ्यांचे बल्ले-बल्ले, 13 व्या हप्त्यापूर्वी सरकारची मोठी घोषणा

PM Kisan Latest News: तुम्हीही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी सरकारकडून एक आनंदाची बातमी आहे.
Farmer
FarmerDainik Gomantak

Kisan Credit Card: तुम्हीही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी सरकारकडून एक आनंदाची बातमी आहे. 13 व्या हप्त्यापूर्वी सरकारने कोट्यवधी शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी दिली आहे. सरकारच्या या घोषणेचा फायदा देशातील 14 कोटी शेतकऱ्यांना मिळणार आहे. केंद्र सरकारने चालू आणि पुढील आर्थिक वर्षासाठी किसान क्रेडिट कार्ड (KCC) द्वारे कृषी आणि इतर संबंधित कामासाठी 3 लाख रुपयांपर्यंतच्या अल्प मुदतीच्या कर्जासाठी व्याज सवलत योजना सुरु ठेवण्यास मान्यता दिली आहे.

7 टक्के सवलतीच्या व्याजदराने कर्ज उपलब्ध

KCC च्या माध्यमातून देशातील शेतकरी कृषी आणि संबंधित कामांसाठी पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्यपालन आणि मधमाशीपालन यासह तीन लाख रुपयांच्या मर्यादेपर्यंत अल्प मुदतीचे पीक कर्ज KCC द्वारे मिळवू शकतात. यासाठी सरकार (Government) अनुदान देते. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना (Farmer) 7 टक्के सवलतीच्या व्याजदराने कर्ज दिले जाते.

Farmer
PM Kisan Yojana: मोठा झटका! शेतकऱ्यांना परत करावे लागणार 2000 रुपये, यादी जाहीर

वेळेवर परतफेड केल्यास अतिरिक्त सवलत उपलब्ध

कर्जाची वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार दरवर्षी 3 टक्के अतिरिक्त व्याज सवलत देते. अशा प्रकारे शेतकऱ्यांना या कर्जावर वार्षिक 4 टक्के दराने व्याज द्यावे लागते. आरबीआयने जारी केलेल्या परिपत्रकात असे म्हटले की, 'कर्ज देणाऱ्या संस्थांसाठी 2022-23 आणि 2023-24 या वर्षासाठी व्याज सवलतीचा दर 1.5 टक्के असेल. 2021-22 या आर्थिक वर्षासाठी ही मदत रक्कम 2 टक्के होती.'

Farmer
PM Kisan: शेतकऱ्यांची चांदी ! पीएम किसान योजनेबाबत सरकारने केली मोठी घोषणा

दुसरीकडे, आरबीआयने ही माहिती अशा वेळी जारी केली आहे, जेव्हा 10 कोटींहून अधिक शेतकरी पीएम किसानच्या 13 व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. मागे, पीएम मोदी म्हणाले होते की, 'शेतकऱ्यांना स्वस्त दरात खते देण्यासाठी केंद्र सरकार यावर्षी 2.5 लाख कोटी रुपयांहून अधिक खर्च करेल.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com