PM Kisan Scheme: तारीख ठरली! 'या' दिवशी करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात येणार हप्ता

PM Kisan Scheme: देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे.
Farmer
FarmerDainik Gomantak

PM Kisan Scheme: देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. हे पैसे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जातील. आतापर्यंत 12 हप्त्यांचे पैसे केंद्र सरकारने वर्ग केले आहेत.

कोट्यवधी शेतकऱ्यांना 12 हप्त्यांचा लाभ मिळाला आहे

आत्तापर्यंत 8.42 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना (Farmer) 12 हप्त्यांचा लाभ मिळाला आहे. सध्या देशभरातील 12 कोटींहून अधिक शेतकरी या सरकारी योजनेचा लाभ घेत आहेत.

Farmer
PM Kisan Scheme: शेतकर्‍यांसाठी मोठी अपडेट, या दिवशी होणार 12 वा हप्ता जमा

गेल्या वर्षी 1 जानेवारीला पैसे ट्रान्सफर झाले

मागील पॅटर्न पाहिल्यास, 1 जानेवारी 2022 रोजी पीएम मोदींनी (PM Modi) दुपारी 12:30 वाजता शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले. गेल्या वर्षी पीएम मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पैसे ट्रान्सफर केले होते. या अंतर्गत सुमारे 10 कोटी शेतकऱ्यांना 20,000 कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित करण्यात आली.

तुमच्या हप्त्याचे स्टेटस तपासा-

>> तुम्हाला प्रथम अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जावे लागेल.

>> यानंतर Farmer Corner वर क्लिक करा.

>> आता तुम्ही येथे लाभार्थी यादीत तुमचे नाव तपासू शकता.

>> तुम्हाला येथे ई-केवायसी आणि जमिनीची संपूर्ण माहिती द्यावी लागेल.

>> स्टेटसच्या पुढे 'yes' लिहिले असेल तर 13 व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात ट्रान्सफर केले जातील.

Farmer
PM kisan Samman Nidhi Scheme: 10 वा हप्ता नवीन वर्षात 1 जानेवारीला

या क्रमांकांवर संपर्क करा

तुम्हाला या योजनेशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास, तुम्ही हेल्पलाइन क्रमांक 155261 किंवा 1800115526 किंवा 011-23381092 या क्रमांकावर संपर्क साधू शकता. याशिवाय, pmkisan-ict@gov.in या ईमेल आयडीवर मेल करुनही तुम्ही तुमची समस्या सांगू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com