PM Kisan New Rule: पीएम किसान योजनेत मोठा बदल, ताबडतोब हप्ता परत करा; नाहीतर...

PM Kisan Yojana Update: जर तुम्हीही या योजनेत तुमची कागदपत्रे अपडेट केली नसतील तर लगेच करा, कारण या योजनेत होणाऱ्या फसवणुकीबाबत सरकार कडक झाले आहे.
PM Kisan Yojana
PM Kisan YojanaDainik Gomantak

PM Kisan Samman Nidhi Yojana Latest Updates: तुम्हीही पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आता नव्या नियमानुसार शेतकरी योजनेत दिलेली रक्कम सरकार वसूल करणार आहे. वास्तविक, आतापर्यंत सरकारने या योजनेत 8 बदल केले आहेत. जर तुम्हीही या योजनेत तुमची कागदपत्रे अपडेट केली नसतील तर लगेच करा, कारण या योजनेत होणाऱ्या फसवणुकीबाबत सरकार कठोर निर्णय घेत आहे.

नवीन नियमानुसार, जर तुम्ही कागदपत्रे अपडेट केली नाहीत तर तुमचा पेमेंट घेणाऱ्यांच्या बनावट यादीत समावेश केला जाईल आणि तुम्हाला आतापर्यंत मिळालेले सर्व हप्ते परत करावे लागतील.

PM Kisan Yojana
PM Kisan: सरकारकडून आर्थिक मदत हवी का? लगेच करा नोंदणी; खात्यात येतील पैसे

पीएम किसान योजनेत आतापर्यंत 8 बदल

विशेष म्हणजे, पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत 11व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात आले आहेत. आता शेतकरी (Farmer) बाराव्या हप्त्याची वाट पाहत आहेत. मात्र आता अनेक अपात्र शेतकरीही या योजनेचा लाभ घेत आहेत. या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने (Government) या योजनेचे नियम बदलले आहेत, जेणेकरुन अशा लोकांना ओळखता येईल. अलीकडेच लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे आवश्यक करण्यात आले आहे.

या शेतकऱ्यांकडून सरकार वसूल करणार!

पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत सरकारने बनावट शेतकऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली असून नोटिसाही पाठवत आहे. अनेक करदातेही याचा फायदा घेत आहेत, तर दुसरीकडे, अशी अनेक कुटुंबे आहेत, जिथे पती-पत्नी दोघेही हप्ते घेत आहेत. या योजनेच्या नियमांनुसार, शेत पती-पत्नी दोघांच्या नावावर असले पाहिजे, परंतु ते एकत्र राहत असल्यास आणि कुटुंबातील मुले अल्पवयीन असल्यास, केवळ एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ दिला जाईल.

PM Kisan Yojana
PM Kisan: 13 व्या हप्त्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 30 नोव्हेंबरपर्यंत खात्यात येणार 2000 रुपये !

दुसरीकडे, तुमच्याकडूनही अशी चूक झाली असेल, तर तुम्ही चुकीच्या पद्धतीने घेतलेली रक्कम स्वेच्छेने परत करा. यासाठी सरकारने पीएम किसान पोर्टलवर एक सुविधा दिली आहे. त्याची प्रक्रिया जाणून घेऊया...

ऑनलाइन पैसे परत

सर्वप्रथम https://pmkisan.gov.in/ पोर्टलवर जा.

उजवीकडे बॉक्सच्या तळाशी, 'Refund Online' या पर्यायावर क्लिक करा.

आता तुमच्यासमोर दोन पर्याय असतील.

PM Kisan Yojana
PM Kisan: PM किसानच्या 13 व्या हप्त्यापूर्वी आली मोठी बातमी, तुम्हीही म्हणाल...

यामध्ये पहिला पर्याय- जर तुम्ही पीएम किसानचे पैसे परत केले असतील तर पहिला पर्याय तपासा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.

यानंतर आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाका.

आता इमेज टेक्स्ट टाइप करा आणि Get Data वर क्लिक करा.

जर तुम्ही पात्र असाल तर 'तुम्ही कोणत्याही परताव्याच्या रकमेसाठी पात्र नाही' असा संदेश दिसेल, अन्यथा रिफ केलेली रक्कम दिसेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com