PM Matritva Vandana Yojana: महिलांना केंद्र सरकार देणार 6000 रुपये

केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ फक्त महिलांनाच घेता येणार आहे. या योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना (PMMVY Scheme) आहे.
PM Matritva Vandana Yojana
PM Matritva Vandana YojanaDainik Gomantak

PM Matritva Vandana Yojana: केंद्र सरकारद्वारे (Central Government) देशात अनेक विशेष योजना चालवल्या जातात, ज्या अंतर्गत लोकांना आर्थिक मदत दिली जाते. मोदी सरकार देशातील महिला, गरीब, शेतकरी अशा सर्व घटकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवते, ज्या अंतर्गत आर्थिक मदत केली जाते. अशीच एक केंद्र सरकारची योजने जाहीर झाली आहे. ज्या अंतर्गत महिलांच्या खात्यात संपूर्ण 6000 रुपये ट्रान्सफर केले जातात.

PM Matritva Vandana Yojana
Atal Pension Scheme: पती-पत्नी दोघांनाही मिळणार दरमहा 10 हजार रुपयांपर्यंत पेन्शन

महिलांना 6 हजार रुपये दिले जातात

केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ फक्त महिलांनाच घेता येणार आहे. या योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना (PMMVY Scheme) आहे. ज्या अंतर्गत केंद्र सरकार महिलांना पूर्ण 6000 रुपये देणार आहे. 2017 मध्ये सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेअंतर्गत, प्रथमच गर्भवती असलेल्या आणि स्तनपान करणाऱ्या महिलांना आर्थिक मदत दिली जाते. ही योजना 1 जानेवारी 2017 रोजी सुरू झाली. याला प्रधानमंत्री गर्भधारणा सहाय्य योजना असेही म्हणतात.

कोण अर्ज करू शकतो?

  • या योजनेत गर्भवती महिला अर्ज करू शकतात.

  • कोणती कागदपत्रे लागतील-

  • पालकांचे आधार कार्ड

  • पालकांचे ओळखपत्र

  • मुलाचे जन्म प्रमाणपत्र

PM Matritva Vandana Yojana
स्टॉक निवडण्याचा सर्वात सोपा मार्ग; 5 मिनिटांत स्वतःला बनवा मार्केट एक्सपर्ट!

बँक खाते पास बुक

आई आणि बाळ दोघांचीही चांगली काळजी घेणे हे या योजनेचे उद्दीष्ट आहे, त्यासाठी सरकार त्यांना 6000 रुपयांची आर्थिक मदत देते. सरकार हे पैसे तीन टप्प्यात देते. पहिल्या टप्प्यात 1000 रुपये, दुसऱ्या टप्प्यात 2000 रुपये आणि तिसऱ्या टप्प्यात 2000 रुपये गर्भवती महिलांना दिले जातात. त्याचवेळी, बाळाच्या जन्माच्या वेळी सरकार शेवटचे 1000 रुपये रुग्णालयाला देते.

अधिकृत वेबसाइटला भेट द्या

या योजनेबद्दल अधिक माहितीसाठी, तुम्ही अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता https://wcd.nic.in/schemes/pradhan-mantri-matru-vandana-yojana.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com