Post Office Scheme: 20 लाखांच्या नफ्यासाठी फक्त 150 गुंतवा!

दररोज केवळ 150 रुपये गुंतवले, तर 20 लाखांहून अधिक रक्कम मिळू शकते. सर्वाधिक विश्वासार्ह गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पोस्ट ऑफिस योजनेकडे पाहिले जाते.
Post Office Scheme
Post Office Scheme Dainik Gomantak

देशभरात भारतीय पोस्ट ऑफिसचे (Post Office) जाळे मोठ्या प्रमाणात विखुरले गेले आहे. पोस्टाच्या एकापेक्षा एक उत्तम योजना असून, यातूनच ग्राहकांना तसेच गुंतवणूकदारांना चांगला लाभ मिळू शकतो. मात्र, गुंवतणूक करताना योग्य माहिती घेतल्यास जबरदस्त रिटर्न्स तुम्हाला मिळू शकतात, असे सांगितले जाते. पोस्ट ऑफिसची एक कमाल योजना असून, यामध्ये दररोज केवळ 150 रुपये गुंतवले, तर 20 लाखांहून अधिक रक्कम मिळू शकते. सर्वाधिक विश्वासार्ह गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पोस्ट ऑफिस योजनेकडे पाहिले जाते.

Post Office Scheme
Paytm LPG Offer: पेटीएमवरून बुकिंग केल्यास मिळेल मोफत एलपीजी सिलिंडर!

पोस्ट ऑफिसची ही पब्लिक प्रॉव्हिडंट फंड पीपीएफ स्कीम आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या दररोजच्या खर्चातून काही अनावश्यक खर्च थांबवल्यास 100-150 रुपये रोज बचत करू शकता. इतकेच नाहीतर हे पैसे तुम्ही सरकारच्या छोट्या बचत योजनांमध्ये टाकले तर तुम्हाला मोठा परतावा मिळू शकतो, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जाते.

जर तुमचे वय 25 वर्षे असेल तर लहान रकमेमध्ये मोठा परतावा मिळवण्याची ही सर्वोत्तम संधी. जर तुमचे उत्पन्न 30-35 हजार रुपयांपर्यंत असेल, तर इतर कोणत्याही बचतीव्यतिरिक्त, सुरुवातीला तुम्ही दररोज 100-150 रुपये वाचवू शकता. ही बचत तुम्हाला 45 व्या वर्षी 20 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसा देऊ शकते. जर तुम्ही दररोज 150 रुपयांची बचत करुन पीपीएफमध्ये गुंतवणूक केली तर ते मासिक 4500 रुपये होईल. दरमहा 4500 रुपयांची गुंतवणूक केल्यास वार्षिक 54 हजार रुपयांची गुंतवणूक होईल. 20 वर्षांमध्ये एकूण गुंतवणूक 10.80 लाख रुपये असेल. 7.1 टक्के वार्षिक चक्रवाढीमध्ये तुमचा 20 वर्षांत 20 लाखांपेक्षा जास्त निधी तयार होईल, असे सांगितले जाते.

Post Office Scheme
BOIची वन टाइम सेटलमेंट स्कीम होणार उद्यापासून सुरू

हे खाते फक्त 100 रुपयांमध्ये उघडता येते. या योजनेचे जॉईंट खातेही उघडता येते. खाते उघडतानाच नॉमिनेशनची देखील सुविधा आहे. 15 वर्षांचा मॅच्युरिटी कालावधी पूर्ण झाल्यानंतरही तुम्ही 2 वेळा 5-5 वर्षांसाठी तो वाढवू शकता. यातून मिळणारे संपुर्ण उत्पन्न करमुक्त असते. तिसर्‍या आर्थिक वर्षापासून खात्यावर कर्जही घेता येते. बँक (Bank) किंवा पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही पीपीएफ (PPF) खाते उघडू शकता. PPF वर 7.1 टक्के व्याजदर आहे, जो वार्षिक चक्रवाढ आहे. या खात्यात वर्षभरात किमान 500 रुपये गुंतवणे आवश्यक आहे, तर जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतवू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com