COVID-19 च्या काळातही देशाची आर्थिक व्यवस्था अधिक मजबूत- पंतप्रधान
Prime Minister Narendra Modi: During Covid-19 pandemic Indian Economy is strongerDainik Gomantak

COVID-19 च्या काळातही देशाची आर्थिक व्यवस्था अधिक मजबूत- पंतप्रधान

COVID-19 या साथीच्या रोगाने भारतासह संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थांवर परिणाम केला आहे

"भारताची अर्थव्यवस्था (Indian Economy) COVID-19 च्या काळात झालेल्या परिणामापेक्षा आता अधिक मजबूत झाली असून जेव्हा जगातील प्रमुख देश अर्थव्यवस्था (Economy) सांभाळण्यासाठी साथीच्या काळात आपला बचाव करण्यास सुरुवात केली. त्यावेळी भारत अर्थव्यवस्था सुधारणांमध्ये गुंतलेला होता."असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी केले आहे. (Prime Minister Narendra Modi: During Covid-19 pandemic Indian Economy is stronger)

अहमदाबादमध्ये नोकरीच्या इच्छुकांना प्रशिक्षित करण्यासाठी बांधण्यात आलेल्या सरदारधाम भवनाचे (SardarDham Bhvan) उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने पार पडले याच मेळाव्याला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "कोविड -19 या साथीच्या रोगाने भारतासह संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थांवर परिणाम केला आहे. "

उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "जेव्हा जगातील प्रमुख अर्थव्यवस्था साथीच्या काळात स्वतःचा बचाव करण्यात व्यस्त होत्या, तेव्हा आम्ही सुधारणा करत होतो. जेव्हा जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली, तेव्हा आम्ही भारताच्या बाजूने नवीन संधी पाहिल्या. पीएलआय (प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेन्टिव्ह) सारख्या अनेक योजना सुरू केल्या. त्याचबरोबर त्या साऱ्या योजना आम्लात आणण्यासाठी भारताने पूर्ण प्रयत्न केले. "ही योजना आणल्यामुळे सुरत सारख्या शहरातील कापड क्षेत्राला याचा खूप मोठा फायदा होणार आहे. असे मत देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी मांडले आहे.

Prime Minister Narendra Modi: During Covid-19 pandemic Indian Economy is stronger
LICच्या 'या' योजनेत गुंतवणूक करा आणि दरमहा मिळवा 9000 रुपये पेन्शन

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) मंगळवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, "कोविड -19 च्या काळातही देशाची चालू आर्थिक वर्षात म्हणजेच एप्रिल-जून तिमाहीत देखील भारताची आर्थिक वाढ 20.1 टक्क्यांवर गेली आहे.दुसरीकडे मधील वर्षाच्या याच तिमाहीचा विचार करता त्यावर्षी एकूण देशांतर्गत उत्पादन (GDP) 24.4 टक्क्यांनी कमी झाले होते. आणि आता आलेले आकडे हे भारतीय अर्थव्यवस्थेला समाधान देणारे आहेत.

केंद्र सरकारने कापड आणि ऑटोमोबाईलसह 10 प्रमुख क्षेत्रांसाठी घोषित केलेली पीएलआय योजना महामारीनंतर देशाच्या अर्थव्यवस्थेला वेगाने सावरण्यास मदत करणार आहे.

त्याचबरोबर पंतप्रधानांनी आपल्या देशाला आता एक जागतिक आर्थिक प्रमुख म्हणून पाहिले पाहिजे कारण 21 व्या शतकात भारताला उद्योग क्षेत्रात अधिक संधी भेटणार आहेत.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com